बंगळुरू : कर्नाटक विधानसभेतील भाजपाचे मुख्यमंत्री येडियुरप्पा सरकारच्या बहुमत चाचणीकडे साऱ्या देशाचं लक्ष लागून आहे. भाजपाने बहुमत मिळवण्यासाठी आटापिटा केला आहे, तर दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएसने मिळून भाजपाला सरकारबाहेर ठेवण्यासाठी बहुमत ठराव पाडण्यासाठी मजबूत तटबंदी उभारली आहे. भाजपाला ही तटबंदी भेदण्यात यश येताना दिसत नसल्याने भाजपाच्या गोटात मोठी नाराजी आहे, आता येडियुरप्पा सरकारला एकच गोष्ट वाचवू शकते, ते म्हणजे येडियुरप्पा यांचं भावनिक आवाहन. यासाठी येडियुरप्पा यांनी १३ पानी भाषणाची तयारी केली असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र त्यापूर्वी कर्नाटक विधानसभेतील बहुमत चाचणीपूर्वी, खालील महत्वाच्या ५ घडामोडी जाणून घेणे महत्वाचे आहे.


कर्नाटक विधानसभेतील बहुमत चाचणीपूर्वी महत्वाच्या ५ घडामोडी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१)बहुमत जमवता येईल असं वाटत नसल्याने, येडियुरप्पा हे बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा देऊ शकतात, राजीनाम्याचा केंद्रीय नेतृत्वाकडे येडियुरप्पा यांचा निरोप
२) बहुमत चाचणी होण्यापूर्वी येडियुरप्पा भाषण करतील आणि आपला राजीनामा सोपवतील असं म्हटलं जात आहे. यासाठी येडियुरप्पा यांनी १३ पानी भाषण तयार केल्याचं सांगितलं जात आहे.
३) दुसरीकडे काँग्रेसचे ते २ आमदार अजूनही गायब आहेत. यामुळे अजूनही विरोधीपक्ष आपली तटबंदी सांभाळून आहे. भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी ६ आमदारांची अजूनही गरज आहे. दुसरीकडे काँग्रेस-जेडीएसमधील काही आमदार येडियुरप्पा यांना मतदान करू शकतात, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.


४) कर्नाटक विधानसभेत सकाळपासून आतापर्यंत २०० आमदारांचा शपथविधी पूर्ण झाला आहे, आणि दुसरीकडे कोर्टाने दिलेल्या मुदतीची दुपारी ४ ची वेळ जवळ येत आहे. 


५) येडियुरप्पा यांनी काँग्रेस आमदाराला मंत्रीपद आणि १५ कोटी रूपयांची ऑफर दिल्याची ऑडीओ क्लीप असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.