मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात चांगलेचं थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसच्या पीडितांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. आता केरळमध्ये देखील कोरोनाचे ५ रुग्ण अढळले आहेत. त्यामुळे आता भारतात देखील सर्वत्र कोरोनाची भीती दिसत आहे. भारतात कोरोना रूग्णांची संख्या ३९ पर्यंत पोहोचली आहे. तर कोरोना व्हायरसमुळे आता धुळवडीचा रंग बेरंग होताना दिसत आहे. केरळच्या आरोग्य मंत्री के.के. शैलजा यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. हे रूग्ण भरतातले नसून त्यांच्यावर उपचार देखील सुरू असल्याचं त्यांनी संगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी देखील केरळमध्ये तीन लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समजलं. त्या तिघांचेही टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्या तिघांनाही संपूर्ण उपचारानंतरच रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. हे तिघेही चीनमधून भारतात परतले होते. 



कोरोना व्हायरसमुळे भारतात चीनी वस्तुंना मागणी नाही. बाजारात चीनी रंगांना यंदा मागणी नाही. त्यामुळे दुकानदारांनीही नैसर्गिक रंगांवर भर दिला आहे. तर यंदा कोरोनामुळे धुळवडीसाठी गुलालाची मागणी जास्त असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलंय.


चीन नंतर इटलीमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत इटलीत २०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर जगभारातील मृतांचा आकडा ३ हजार ४०० वर पोहोचला आहे. ९० देशांतील १ लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.