रांची : नक्षलवाद्यांचा उच्छाद सुरुच आहे. झारखंड येथे पुन्हा एकदा नक्षली हल्ला घडवून आणला गेला आहे. नक्षली हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आहेत. झारखंडमधील सरायकेला या ठिकाणी पोलिसांच्या गाडीला नक्षवाद्यांनी लक्ष्य केले. दुचाकीवरुन आलेल्या नक्षलींनी गस्त घातल असलेलेल्या पोलिसांच्या गाडीवर बेछूट गोळीबार केला. गास्त घातल असलेल्या गाडीमध्ये सहा जवान होते. नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस पथक या भागात गस्त घालून माघारी परतत असताना या पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला चढवला. नक्षलवाद्यांनी हल्ला केल्यानंतर शहीद झालेल्या जवानांची शस्त्र घेऊन पलायन केले. दरम्यान, या हल्ल्यात बचावलेले एक जवान यांनी धावत जाऊन तिरुडीह स्टेशन गाठले. त्यांनी या हल्ल्याची माहिती दिली. सात ते आठ मोटारसायकलवरून आलेल्या नक्षलींनी पोलिसांच्या गाडीवर बेछूट गोळीबार केला. यामध्ये पाच जवान जागीच शहीद झाले. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सरायकेलामध्ये नक्षली हल्ला केला गेला होता.