गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली सत्ता राखली आहे, तर काँग्रेसने  थोड्याफार प्रमाणात यश प्राप्त केले आहे. तरीही काँग्रेसला अपेक्षीत असलेले घवघवीत यश मिळविण्यात अपयशी ठरले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी यांच्या नेत्तृत्वाखाली लढलेल्या या निवडणुकीत काँग्रेस का पराभूत झाले याची पाच कारणे आहेत. 


१) गुजराती आस्मितेचा मुद्दा काँग्रेसला अडचणीचा ठरला. 


गुजरातने देशाला पंतप्रधान दिला, त्यामुळे गुजरातमध्ये भाजपचा पराभव झाला असतात तर गुजरातच्या आस्मितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते. पण गुजरातच्या जनतेने असे होऊ दिले नाही. त्यांनी मोदींच्या पारड्यात आपली मत टाकले आहे. 


२) जनतेचा रोष मतपेटीत व्यक्त करण्यात असमर्थता 


जीएसटीच्या मुद्द्यावर गुजरातची जनता नाराज होती. या जनतेच्या रोषाचा फायदा करून घेण्यात काँग्रेस असमर्थ ठरली आहे. तसे झाले असते तर चित्र वेगळे असू शकले असते. 


३) हक्काचे मुस्लिम मतदार दुरावल्याची शक्यता 


राहुल गांधी यांनी गुजरात निवडणुकीत सॉफ्ट हिंदूत्वाचा स्वीकार केला होता. त्यामुळे त्यांनी विविध मंदिरांना भेटी द्या. त्यांच्या या टेम्पल रनमुळे हक्काचा मुस्लिम मतदार दुरावला गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच ओवेसी यांनीही काही प्रमाणात मुस्लिम मते खेचल्याने काँग्रेसला फटका बसला आहे. 


४) मणीशंकर यांच्या वक्तव्याने मतदार संभ्रमात 


मणीशंकर यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'नीच' म्हणणे काँग्रेसला महागात पडलेले दिसले. एका गुजराती व्यक्तीला नीच म्हटल्याने गुजरातच्या जनतेचा संताप झाला आणि काँग्रेसच्या दिशेने येणारे मतदार हे संभ्रमात पडले आणि त्याचा फायदा हा भाजपला झाला. 



५) निवडणुकीपूर्वी शंकरसिंह वाघेला यांचा पक्षत्याग 


काँग्रेसचे दिग्गज नेते शंकरसिंग वाघेला यांनी निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा आणि नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.  त्यामुळे काँग्रेसला मोठा दणका बसला. एक नेतृत्त्व म्हणून त्यांचा फायदा झाला असता. सध्याची आकडेवारी पाहता त्यांनी नवा पक्ष काढून त्यांना वैयक्तीक फायदा झाला नाही. तसेच त्यांच्या पक्षाने मतेही खेचली नाहीत. पण नेतृत्व म्हणून त्यांचा काँग्रेसला फायदा झाला असता.