नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील एटा येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे ७ वर्षाच्या एका मुलाचा मृतदेह नागरिकांना आढळून आला. नागरिकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी केलेल्या तपासात हा प्रकार अंधश्रद्धेतून घडल्याचे पुढे आले. पोलिसांनी आरोपींना अटके केली असता, आरोपींवर बॉलिवूडमधील चित्रपटांचा प्रभाव असल्याचे पुढे आले.


गुड्डू सापडला पण, तो या जगात नव्हता...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी सांगितले की, प्यारेलाल यांचे घर शिव ओमपुरी कॉलनी येथे आहे. प्यारेलाल यांचा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय आहे. त्यांना एकूण ६ मुले आहेत. सहा मुलांपैकी त्यांचा पाच वर्षांचा मुलगा राजा उर्फ गुड्ड हा २९ डिसेंबर २०१७ पासून बेपत्ता होता. त्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी गुड्डूचा कसून शोध घेतला. गुड़्डू  त्यांना सापड़लासुद्धा. पण, गुड्डू या दुनियेत नव्हता. तो केव्हाच हे जग सोडून गेला होता. त्याच्या मृत शरीरावर शस्त्राने वार केल्याच्या खूणा होत्या.


मुलाचा आजार बरा करण्यासाठी शेजाऱ्याच्या मुलाची हत्या...


पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, प्यारेलाल यांच्या घराच्या नजीकच आरोपी धर्मवीर याचे घर आहे. धर्मवीर हा सुद्धा पेशाने ड्रायव्हरच आहे. त्यालाही १४ वर्षाचा मुलगा आहे. पण, तो मीरगीच्या आजाराने ग्रस्त आहे. बॉलिवूडमधील चित्रपटांनी प्रभावीत होऊन धर्मवीरने प्यारेलालच्या मुलाची हत्या केली. प्यारेलालच्या मुलाचा बळी दिल्यावर आपल्या मुलाचा मिरगीचा अजार दूर होईल, अशी धर्मवीरची भावना होती.


अंधश्रद्धेच्या भावनेतून धर्मवीरने प्यारेलालच्या मुलाचे अपहरण केले. त्याला चंदन नावाच्या तांत्रिकाजवळ नेले. तेथे तांत्रिकाच्या मदतीने त्याने मुलाचा बळी दिला.


तांत्रीकासह आरोपी धर्मवीर पोलिसांच्या ताब्यात


पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत पुढे आले की, आरोपीने बॉलिवूडमधील संघर्ष नावाचा चित्रपट पाहिला होता. बळी दिल्यावर आपल्या मुलाचा आजार बरा होईल अशी त्याची धारणा होती. पोलिसांनी आरोपी धर्मवीर आणि तांत्रीक चंदण याला ताब्यात घेतले आहे.