मुंबई : इनकम टॅक्स वाचवण्यासाठी प्रत्येक जण वेग-वेगळ्या ऑप्शनच्या शोधात असतो. अशा परिस्थिती लोक आपले पैसे कोणत्या ठिकाणी सुरक्षित राहतील आणि कोणत्या माध्यमातून आपल्याला जास्त रिटर्नसह अनेक फायदे मिळतील या गोष्टीच्या शोधात असतात. म्हणूनच सर्वोत्तम किंवा सुरक्षित पर्याय म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट. शिवाय टॅक्स वाचविण्यासाठी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. एवढंच नाही तर  फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवल्यानंतर अनेक गोष्टींचा फायदा देखील घेता येतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवल्यानंतर 100 टक्के रिटर्न मिळतं हे निश्चित. गुंतवणूकीच्या अगदी सुरुवातीस हे माहित असतं की मॅच्युरिटीनंतर त्यामध्ये किती नफा होईल.


- टॅक्स वाचविण्यासाठी देखील एफडीचा मोठा फायदा होतो.  पण हा फयदा सर्व एफडींवर मिळत नाही. 5 वर्षांच्या एफडीवर इनकम टॅक्सपासून सुटका मिळते. 


- एफडीवर तुम्ही लोन देखील घेवू शकता. चांगली गोष्ट म्हणजे आपल्या सोयीनुसार कर्ज परतफेड केले जाऊ शकते. एफडीच्या एकूण मूल्याच्या 90% पर्यंत कर्ज मिळू शकते. एफडीवरील कर्जाचे व्याज दर आपल्या गुंतवणूकीवरील व्याजापेक्षा 1-2% जास्त आसते. याचा अर्थ असा की जर तुम्हाला एफडीवर 4% व्याज मिळत असेल तर तुम्हाला 6% व्याजावर कर्ज मिळू शकेल.


- एफडीसह  लिक्विडिटीचा देखील फायदा होतो. म्हणजे तुम्ही कधीही एफडी विड्रॉ करू शकता. असं केल्यास तुम्हाला काही रक्कम भरावी लागेल. 


- HDFC बँक, ICICI बँक आणि  DCB बँक बँकेच्या ग्राहकांना एफडीसह फ्री हेल्थ इंश्‍योरेन्सचा लाभ मिळतो. 


- एफडी सुरक्षित गुंतवणूक आहे, परंतु जर कोणत्याही परिस्थितीत बँक बुडली तर एफडीमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतची शासकीय हमी म्हणून गुंतवलेली रक्कम सुरक्षित असते.