जर विमानाला छिद्र पडला तर? यामुळे किती वाढू शकतो अपघाताचा धोका? जाणून घ्या
प्रश्न असा उभा राहातो की, विमानातील एक छोटा छिद्र किती धोकादायक ठरु शकतो? चला याबद्दल जाणून घेऊ या.
मुंबई : विमान अपघाताच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. ज्यामागची कारण वेगवेगळी असल्याचे समोर आले आहे. हल्लीच दुबईमध्ये विचित्र प्रकार घडला आहे. दुबईहून ब्रिस्बेनला जाणारे एमिरेट्सचे विमान एका मोठ्या अपघातातून बचावले. प्रवास सुरू झाल्यानंतर 14 तासांनंतर जेव्हा विमान ब्रिस्बेनला पोहोचले तेव्हा प्रवाशांच्या लक्षात आले की, विमानात एक होल आहे. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, उड्डाणानंतर 45 मिनिटांनी मोठा आवाज ऐकू आला, परंतु कर्मचार्यांना विचारले असता त्यांनी काहीही घटना घडली असल्याचे स्वीकारले नाही. त्यानंतर लगेचच प्रवासादरम्यान विमानातील खाद्यपदार्थ सेवा बंद करण्यात आली आणि लँडिंगपूर्वी विमान दुसऱ्या धावपट्टीवर उतरवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
परंतु आता प्रश्न असा उभा राहातो की, विमानातील एक छोटा छिद्र किती धोकादायक ठरु शकतो? यामुळे मृत्यूचा धोका नक्की किती वाढतो?
तर यावर एका अहवालाचे असे म्हणणे आहे की, अपघात किती गंभीर असेल, हे त्या छिद्राच्या आकारावर अवलंबून आहे. जर छिद्र लहान असेल तर फ्लाइटच्या आतील दाबाचा फारसा परिणाम होत नाही, कारण त्यामुळे जास्त फरक पडत नाही.
याचे उदाहरण विमानाच्या खिडकीतून समजून घेऊ शकतात. विमानाच्या खिडकीत एक लहान छिद्र असते, ज्याला ब्लीड होल म्हणतात.
प्रवासादरम्यान विमानात हवेचा दाब कमी असल्याने प्रवाशांना श्वास घेता येतो. विमानाच्या काचेच्या खिडकीत बनवलेला एक छोटासा ब्लीड होल हा दाब कायम ठेवण्याचे काम करतो. त्यामुळे असे म्हणता येईल की, जर विमानात लहान छिद्र असेल तर कोणतीही हानी नाही.
मग धोका कधी वाढतो?
अहवालानुसार, जर काही कारणास्तव खिडकीच्या या छिद्राचा आकार मोठा झाला किंवा खिडकीतच काही नुकसान झाले, तर धोका वाढतो. अशा स्थितीत हवेचा दाब आधी बिघडतो. या दबावामुळे मृत्यूही होऊ शकतो. कारण जेव्हा दाब वाढू लागतो तेव्हा त्याचा थेट परिणाम नाक आणि कानापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या धमन्यांवर होतो. इतका दबाव कसा सहन करायचा हे शरीराला कळत नाही. ज्यामुळे मृत्यू होतो.