Exchange Old AC With New One Offer flipkart : सध्या मार्च महिन्यात पाऊस पडत असला तरीही अजून संपूर्ण एप्रिल, मे आणि जून जाणं बाकी आहे. त्यामुळं उन्हाळा पुन्हा आपला पाठलाग करणार हे अटळ. आता याच उन्हाळ्याशी (Summer) दोन हात कसे करायचे हे आपआपल्या पद्धतीनुसार ठरवण्याकडे सर्वांचा कल. कुणी सुती कपडे वापरत, कुणी सनकोट, टोप्या वापरत तर कुणी प्रखर सूर्यप्रकाशात घराबाहेरच न पडता या उन्हाळ्याचा सामना करताना दिसतं. काही मंडळी घरच्या घरी थंडगार वारा मिळावा यासाठी एसी खरेदी करताना दिसतात. तर, AC असणारी मंडळी तो व्यवस्थित काम करतोय की नाही? याचीच पाहणी करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयत्या उन्हाळ्यात एसी बिघडणं म्हणजे अनेकांसाठीच एक मोठं संकट. काय म्हणता? तुम्हीही याच संकटाला सामोरे जाताय? नव्या एसीच्या किमती अवाक्याबाहेरच्या वाटतायत? काळजी करु नका. कारण, आता तुम्ही जुना AC देऊन नवा एसी घरी आणू शकता. अगदी बरोबर ऐकताय. (E Commerce site) ई कॉमर्स साईट, flipkart नं सध्या ही बंपर ऑफर सर्वांसाठीच आणली आहे. 


हेसुद्धा वाचा : Used Cars: जुन्या गाडीसाठी तुम्हाला मिळेल मागेल ती किंमत, फक्त या गोष्टींची काळजी घ्या; खरेदीसाठी रांग लागेल


 


सूत्रांच्या माहितीनुसार फ्लिपकार्टनं सर्टिफाइड ई-वेस्ट रिसायक्लिंग कंपन्यांशी काही करार केले आहेत. त्यामुळं तुम्हीही नवा एसी खरेदी करु इच्छिता आणि जुना एसी बदलू इच्छिता तर ही सवलत मिळवण्यासाठी फ्लिपकार्टच्या उपक्रमाचा फायदा घ्या. आता हा फायदा नेमका मिळवायचा कसा? तुम्हीही विचार करताय.... चला पाहूया... 


Flipkart Air Conditioner Exchange Programme 


  • फोनवर Flipkart चं अॅप सुरु करा, किंवा डेस्कटॉपवर Flipkart ची वेबसाईट सुरु करा. 

  • तिथं तुम्हाला हवा आहे तो एसी निवडा 

  • प्रोडक्ट पेजवर तुम्हाला Flipkart Air Conditioner Exchange Programme हा पर्याय दिसेल. 

  • हा पर्याय निवडून त्यावर जुन्या एसीची माहिती, ब्रँड, मॉडेल, वर्ष अशी माहिती द्या. 

  • माहितीची पूर्तता केल्यानंतर एक्स्चेंज व्हॅल्यूची आकडेमोड करून तुम्हाला पुढील प्रक्रिया करता येईल. 

  • ऑर्डर प्लेस केल्यानंतर तुम्हाला फ्लिपकार्टकडून कन्फर्मेशन मेल आणि एसएमएस येईल. 


एसी तर बुक झाला आता पुढं काय? 


  • पुढे एक ट्रेंड टेक्नीशियन फ्लिपकार्ट तुमच्या घरी पाठवून जुना एसी अनइंस्टॉल करण्यासाठीचा दिवस निवडेल. 

  • कोणत्याही शुल्काशिवाय तो जुना एसी अनइंस्टॉल करेल आणि एक्स्चेंज ऑफरसाठी जुन्या एसीची पडताळणी करेल. 

  • सर्व पडताळणी झाल्यानंतर तो अनइंस्टॉलेशनचं प्रमाणपत्र देईल. नवा एसी घरी येईल तेव्हा हे प्रमाणपत्र दाखवावं लागेल. तेव्हा ते सांभाळून ठेवा. 

  • पुढे डिलीवरी एजंट तुमच्या दारी नवा एसी घेऊन येईल. तेव्हा त्याला अनइंस्टॉलेशनचं प्रमाणपत्र दाखवा. 

  • त्याच्याकडे असणारी माहिती आणि प्रमाणपत्रातील माहिती योग्य असल्याचं पाहून तो नवा एसी ठेवेल आणि जुना एसी घेऊन जाईल.