Used Cars: जुन्या गाडीसाठी तुम्हाला मिळेल मागेल ती किंमत, फक्त या गोष्टींची काळजी घ्या; खरेदीसाठी रांग लागेल

Used Car Tips: जर तुम्ही जुनी गाडी विकण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी मागेल तितकी किंमत मिळावी अशी इच्छा असेल तर काही टिप्स फॉलो करण्याची गरज आहे. या गोष्टींचं पालन केल्यास तुम्हाला गाडीसाठी चांगली किंमत मिळेल आणि गाडी घेण्यासाठी रांग लागेल.   

Mar 22, 2023, 20:01 PM IST
1/5

Tips To Sell Used Car: आपली जुनी गाडी विकताना योग्य मोबदला मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. दुसरीकडे खरेदी करणारी व्यक्ती आपल्या स्वस्तात कार मिळावी या अपेक्षेत असतो. आता जर तुमच्याकडे गाडी असेल आणि ती विकण्याची इच्छा असेल तर काही गोष्टींचं पालन केल्यास तुम्हाला मागेल ती किंमत मिळू शकते. इतकंच नाही तर गाडी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची रांग लागेल.   

2/5

1- कागदपत्रं - गाडी विकताना सर्वात प्रथम कागदपत्रांची तपासणी केली जाते. यामुळे सर्वात प्रथम तुमच्या गाडीची कागदपत्रं व्यवस्थित तपासून घ्या. यामध्ये रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, सर्व्हिस रेकॉर्ड, प्रदूषण प्रमाणपत्र, इन्श्यूरन्स यांचा समावेश आहे.   

3/5

2 - सर्व्हिस - जर तुमच्या गाडीची सर्व्हिस करायची राहिली असेल तर तात्काळ करुन घ्या. कारचं इंजिन किंवा इतर पार्टमध्ये काही बिघाड असेल तर तोदेखील तात्काळ दुरुस्त करुन घ्या. कोणतीही व्यक्ती जुनी गाडी खरेदी करतानाही ती पूर्णपणे नीट असावी अशी अपेक्षा करत असते.   

4/5

3 - कारची आतून स्वच्छता - कार फक्त बाहेरुनच नाही तर आतूनही स्वच्छ ठेवा. कार जितकी बाहेरुन चांगली दिसते तितकीच आतूनही सुंदर असावी अशी इच्छा अशते. त्यामुळे कार धुतल्यानंतर ड्राय क्लीनही करुन घ्या. गरज असल्यास थोडं डेंटिंग-पेंटिंग करत नवा लूक देण्याचा प्रयत्न कर. गाडी नवी कोरी दिसेल असा प्रयत्न करा.   

5/5

4 - किंमत - गाडी खरेदी करताना सर्व चर्चा किंमतीजवळ येऊन थांबतात. कारची किंमत सांगतानाच इतकी सांगा की समोरील व्यक्तीशी चर्चा केल्यानंतर किंमत कमी केली तरी तुमचाच फायदा होईल.