Viral News : तुम्ही नोकरी का करता? हा असा प्रश्न विचारला असला अनेकांची बहुविध उत्तरं असतात. पगारासाठी, सुट्ट्यांसाठी, आवडीच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी, चांगल्या भविष्यासाठी ही अशी उत्तरं आपल्याला मिळतात. शेवटचे दोन पर्याय तुलनेनं दुय्यम स्थानावर असले तरीही आम्ही पगारासाठी काम करतो असं म्हणणारे अनेकजण आपण पाहिले असतील. इतकंच काय, तर तुम्हीआम्हीसुद्धा असंच एखादं कारण देऊ, नाही का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवसातील साधारण 9 ते 12 तास विविध संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी ज्यावेळी महिना अखेरच्या टप्प्यात येतो त्यावेळी एकाच गोष्टीची आस लावून बसलेले असतात. ती गोष्ट म्हणजे महिन्याच्या शेवटच्या दिवशी किंवा नव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी खात्यात जमा होणारा पगार. बरं, हा पगार मिळाल्यानंतरही अनेकांचा नकारात्मक सूर आळवला जातच असतो. 


कारण, कागदोपत्री दावण्यात आलेला पगार आणि खात्यात येणारा पगार या आकड्यांमध्ये असणारी तफावत. हा कर, तो तर असे अनेक छुपे खाचखळगे या पगाराच्या आकड्यात असतात आणि सरतेशेवटी हातात येणाऱ्या रकमेवर याचे थेट परिणाम दिसून येतात. इथं चांगल्यातलं चांगलं काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचाही भ्रमनिरास होतो. तुम्हीही अशाच परिस्थितीचा सामना केला असेल. अचानकच पगाराचा मुद्दा इतका चर्चेत येण्याचं कारण ठरत आहे एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्य़ाची सोशल मीडिया पोस्ट. 


सूत्रांच्या माहितीनुसार (Flipkart) फ्लिपकार्ट या ईकॉमर्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं ही व्यथा मांडली. '12 तास काम करून अपार मेहनतीनं जे पैसे कमवले आहेत त्यातला अर्धा भाग तर Tax मध्ये जातोय. मी सरकारला 30 टक्के कर देणं अपेक्षित आहे. आता उरलेल्या रकमेतून मी काही कॅफिनेटिड बेवरेज अर्थात शीतपेय विकत घ्यायचा विचार करतोय ज्यावर मला 28 टक्क्यांचा जीएसटीसुद्धा द्यावा लागेल. मी 12 तास काम तर, पगारात्या रकमेतून 50 टक्क्यांहून अधिक कर भरण्यासाठीच करतोय', असा उपरोधिक सूर संचित गोयल या युजरनं/ कर्मचाऱ्यानं आळवला. 



नेटकरी म्हणतात, आपण समदु:खी 


सोशल मीडियावर आपल्या पगाराची व्यथा मांडणाऱ्या या कर्मचाऱ्यानं वास्तव मांडताच इतरही नेटकऱ्यांनी त्यावर व्यक्त होण्यास सुरुवात केली. अनेकांनी तर, 'आपण समदु:खी' म्हणत त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला. यावर कितीही विनोदी प्रतिक्रिया आल्या असल्या तरीही देशातील नोकरदार वर्गावर असणारा ताण आणि त्यांच्या हाती येणारी पगाराची तुटपूंजी रक्कम पाहता परिस्थिती किती निराशाजनक आहे हे प्रकर्षानं जाणवलं.