फ्लिपकार्टवर रिपब्लिक डे सेल, 80% मिळेल डिस्काऊंट
१ फेब्रुवारी रोजी बजेट सादर होणार आहे. त्यामुळे त्याआधी ऑनलाईन आणि ऑफलाईन रिटेलर्स ऑफर्सचा पाऊस पाडत आहेत.
नवी दिल्ली : १ फेब्रुवारी रोजी बजेट सादर होणार आहे. त्यामुळे त्याआधी ऑनलाईन आणि ऑफलाईन रिटेलर्स ऑफर्सचा पाऊस पाडत आहेत. सध्या ऑफलाईन स्टोर्समधील महासेलमध्ये वेगवेगळ्या वस्तूंवर मोठी सूट दिली जात आहे. तर अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरही मोठी सूट दिली जात आहे.
किती तारखेला आहे सेल?
अॅमेझॉननंतर आता फ्लिपलार्टनेही रिपब्लिक डे सेलची घोषणा केली आहे. २१ ते २३ जानेवारीपर्यंत हा सेल चालणार आहे. फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेलमध्ये सिटी बॅंक डेबिट आणि क्रेडीट कार्ड खरेदीवर १० टक्के कॅशबॅक देणार आहे.
१० हजार रूपयांचं कॅशबॅक
२१ ते २३ जानेवारीपर्यंत स्मार्टफोन्सवर ऑफर दिली जाणार आहे. यात स्वस्त आणि महाग दोन्ही फोन आहेत. प्रिमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये फ्लिपकार्ट ४८, ९९९ रूपयात गूगल पिक्सल 2 XL फोन मिळणार. सोबतच एचडीएफसी क्रेडिट कार्डने ईएमआय पेमेंट करणा-यांना १० हजार रूपयांचा कॅशबॅक दिला जाणार आहे. त्यासोबतच सॅमसंग गॅलक्सी S7 २६, ९९० रूपयात अणि २९,९९९ रूपयात शाओमीचा Mi Mix 2 मिळेल.
या वस्तूंवर ८० टक्के सूट
बजेट कॅटेगरीमध्ये ग्राहक शाओमी रेडमी नोट ४, लिनोवो K8 Plus, मोटो G5 Plus, सॅमसंग गॅलक्सी ऑन नेक्स्ट, इनिफिंक्स झिरो ४ आणि पॅनासॉनिक Eluga A3 सारखे मोबाईल डिस्काऊंटवर खरेदी करू शकतील. स्मार्टफोन व्यतिरीक्त लॅपटॉप, कॅमेरा आणि अॅक्सेसरीजवर ६० टक्के डिस्काऊंट मिळेल. तसेच टिव्ही आणि अप्लायंसेसवर ७० टक्के सूट मिळणार आहे.