मुंबई : फ्लिपकार्ट होलसेलने नवीन क्रेडिट स्किम सुरू केली आहे. या स्किमच्या मदतीने किराणा दुकानदार आणि रिटेलर्स आपल्या वर्किंग कॅपिटलच्या गरजा पूर्ण करून व्यवसाय वाढवण्यास मदत होणार आहे. कंपनीच्या या स्किमच्या मते व्यवसायिकाला 2 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

14 दिवसांपर्यंत कंपनीचे बिनव्याजी कर्ज
कंपनीने म्हटले आहे की, फ्लिपकार्ट होलसेल क्रेडिट स्किम आयडीएससी फर्स्ट बँकेसोबत भागिदारीमध्ये किराणा दुकानदारांना मिळणार आहे. यामध्ये ईजी क्रेडिट सामिल आहे. या नवीन ऑफरमध्ये किराणा दुकानदार आयडीएफसी फर्स्ट बँक आणि अन्य फिनटेक इंस्टिट्युशन सोबत भागीदारीमध्ये एंड टू एंड डिजिटल ऑनबोर्डिंगच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज घेऊ शकतात. या स्किममध्ये 5000 रुपयांपासून 2 लाख रुपयांपर्यंतचे  लोन दिले जाईल. यामध्ये म्हणजेच इंटरेस्ट फ्री चा कालावधी 14 दिवसांपर्यंतचा असणार आहे.


B2B रिटेल इकोसिस्टिमला फायदा
फ्लिपकार्ट होलसेलचे वरिष्ठ अधिकाऱी आदर्श मेनन यांनी म्हटले की,  कंपनीचे लक्ष किराणा  आणि अन्य रिटेलर्ससाठी व्यवसाय सोपा करणे हे आहे. ही नवीन स्किम रिटेलर्सला व्यवसायात येणाऱ्या अडचणींना दूर करू शकते.


फ्लिपकार्ट होलसेलचे 15 लाखाहून अधिक सदस्य
फ्लिपकार्ट होलसेलचे देशभरात 15 लाखाहून अधिक सदस्य आहेत. यामध्ये दुकानदार, रिटेलर्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट, कॅफेटेरिया आणि ऑफिसेस सहभागी आहेत.