गुवाहाटी : मान्सून आसाममध्ये दाखल झाल्यानंतर तेथे गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. राज्यात पूर आला असून 16 जिल्ह्यातील 704 गावांना पूराचा फटका बसला आहे. ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सर्व जिल्ह्यातील उपायुक्तांना पूर बाधित भागात मदतकार्य वेगात करण्याचे निर्देश दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपायुक्त पल्लव गोपाल झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सतत पाऊस आणि ब्रह्मपुत्रांच्या वाढत्या पातळीमुळे आलेल्या पुराने सुमारे 25,000 लोक प्रभावित झाले असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 




एएसडीएमएनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा विभागांनी सहा जिल्ह्यात 142 मदत शिबिरे आणि वितरण केंद्रे सुरु केली आहेत. यात 19000हूनअधिक लोक राहत आहेत. पुरात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील धेमाजी, तिनसुकिया, माजुली आणि डिब्रूगढ हे जिल्ह्ये सर्वाधित प्रभावित झाले आहेत.अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.