मुंबई : बंगालच्या उपसागरावर हवेचे चक्रीवादळ कमी दाबाच्या क्षेत्रात बदलण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि बिहारसह अनेक राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारत हवामान खात्याच्या माहितीनुसार, दिल्ली, मेरठ, मोदीनगर, अमरोहा, चांदपूर, हस्तिनापूर, हापूर, गाझियाबाद, विराटनगर, सोनीपत, बागपत, झज्जर, रोहतक आणि आसपासच्या भागात येत्या काही तासात पाऊस पडण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तराखंडमध्ये हवामान खात्याचा इशारा


उत्तराखंडमध्ये हवामान खात्याने पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हरिद्वार, देहरादून, टिहरी, पौरी, चमोली, पिथौरागड आणि नैनीतालमध्ये येत्या 24 तासांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने कहर केला होता. ज्यामुळे विविध ठिकाणी भूस्खलन आणि पाणी साचले होते. हवामान खात्याने (आयएमडी) 9 ऑगस्ट रोजी राज्यातील बहुतांश भागात पावसाचा अंदाज वर्तविला आहे.



बिहारमध्ये एनडीआरएफ टीमकडून मदतकार्य


बिहारमधील पूर आपत्तीला सामोरे जाण्यासाठी सध्या राज्यातील १४ जिल्ह्यात एनडीआरएफची २३ पथके सारण, पूर्व चंपारण, दरभंगा, समस्तीपूर, गोपाळगंज, कटिहार, किशनगंज, अररिया, सुपौल, मधुबनी, पश्चिम चंपारण, सीवान, वैशाली आणि मुजफ्फरपूर जिल्ह्यात तैनात आहेत. मदत आणि बचावकार्य सुरु आहे.


एनडीआरएफचे पथक मोटार बोटीद्वारे पूरग्रस्त भागातील नागरी वैद्यकीय पथकांची ने-आण करण्यात मदत करीत आहेत, जेणेकरून गरजू लोकांना योग्य वैद्यकीय सेवा पुरविली जाऊ शकेल.



केरळमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन


केरळमध्ये पाऊस सुरूच आहे. केरळमधील इडुक्की येथे दरड कोसळल्यामुळे मृतांचा आकडा 24 वर पोहोचला आहे. अनेक लोक अजूनही ढिगार्‍याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) एर्नाकुलम, इडुक्की, थ्रीसुर, पलक्कड, मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासारगोड या 9 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे.




दिल्लीचे हवामान


रात्री उशिरा देशाची राजधानी दिल्लीत अचानक हवामान बदलले. दिल्लीच्या बर्‍याच भागात मुसळधार पाऊस पडला. आयएमडीनुसार दिल्लीत आज अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या पावसाची शक्यता आहे.



राजस्थानच्या अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता


पूर्व राजस्थान आणि पश्चिम राजस्थानमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार अजमेर, अलवर, बनसवारा, बारण, भरतपूर, दौसा, जयपूर, सीकर, उदयपूर, बाडमेर, बीकानेर, चुरू, जैसलमेर, जोधपूर, नागौर आणि श्रीगंगानगर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.


या राज्यांमध्ये पावसाचा अंदाज


हवामान अंदाज संस्था स्कायमेटच्या मते, पाऊस केरळमध्ये सुरूच राहील. सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि दक्षिणपूर्व राजस्थानमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, तेलंगणा, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक, गुजरात, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमधील काही भागात पाऊस पडेल. त्याशिवाय पंजाब, हरियाणा, दिल्ली, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, उत्तर राजस्थानमध्येही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.