नवी दिल्ली: देशातील पूर्वेकडील राज्यात पूर परिस्थिती वाढत चालली आहे. आसाम आणि बिहारमध्ये पुराची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. त्यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर पश्चिम बंगालमध्ये उद्भवलेल्या आपत्तीत सुधारणा झाली आहे. मंगळवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे उत्तर बंगालमधील प्रमुख नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. पुरामुळे बिहारमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या ५६ आहे. तर १३ जिल्हांमध्ये ६९.८१ लाख लोकांना पुराचा हादरा बसला आहे. उत्तर बिहारमध्ये पुरामुळे परिस्थिती गंभीर झाली असून नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे.


पंजाब आणि हरियाणामध्ये अधिकतर तापमान सुस्थितीत आहे. पंजाबच्या लुधियानामध्ये २७ मिलीलीटर पर्जन्यवृष्टी झाली. 



आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीने धारण केले रौद्र रूप:
आसाममध्ये ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे रेल्वे रूळ पाण्याखाली गेले आहेत पुरामुळे आसाममधील ३२ ते २५ जिह्यांना धोका पोहचला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे सुमारे ३३ लाख लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. काही ठिकाणं सोडली तर पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी पुन्हा जोरदार पाऊस झाला. उत्तर बंगालमध्ये सगळ्या प्रमुख नद्यांनी वाढलेली पातळी काही प्रमाणात कमी झली असून अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जलपायगुडी आणि अलीपूरद्वार येथील स्थितीत सुधारणा झाली.