शेओपूर : भोपाळमध्ये २८ वर्षीय पपीता गुज्जर या महिलेची वॉशरूममध्ये प्रसुती झाली आणि बाळ कमोडमध्ये वाहून गेल्याची घटना घडली आहे. पण बाळाचे दैव बलवत्तर असल्याने त्याला सीवेज टॅंकमधून काढण्यात यश आले.  
  
 पपीता गुज्जर या महिलेचा गरोदरपणाचा अंतिम टप्पा चालू होता. केव्हाही डिलेव्हरी होऊ शकेल अशी परिस्थिती होती.  अचानक तिच्या पोटात दुखायला सुरूवात झाली. पोटात कळ आल्याने ती वॉशरूमला गेली.  वेदना असह्य झाल्याने तिच्या पतीने पपीताला रुग्णालयात दाखल केले. पण तेव्हा गर्भाशयात  बाळ  नसल्याचे पाहून डॉक्टरही आवाक झाले.  
 
 थोड्या वेळातच डॉक्टरांना सार्‍या प्रकाराचा अंदाज आला. त्यांनी गुज्जर परिवाराच्या घरी अ‍ॅम्ब्युलन्स पाठवली. घरातील वॉशरूममध्ये सीवेज  टॅंकमध्ये बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. गुदमरलेल्या अवस्थेतील बाळ सुखरूपपणे वाचवण्यास डॉक्टरांना  यश आले.  
 
भोपाळ मध्ये घडलेला हा प्रकार  शेओपूर जिल्ह्यातील आहे. हा भाग स्त्री-भ्रुणहत्येसाठी कुप्रसिद्ध आहे.  गुज्जर दांपत्यांना  मुलगी झाल्याने  हा प्रकार स्त्री भ्रुणहत्येचा प्रयत्न  तर नाही ना ? या विषयी पोलिसांनी चौकशीला  सुरूवात केली आहे.