भारतीय लष्करात लवकरच `फ्लाईंग सोल्जर` भारतीय जवानांसाठी नवं वरदान
शत्रूच्या मनात धडकी भरणार, आयर्न मॅनसारखं (Iron Man) भारतीय सैनिक आता हवेत उडू शकणार
कृष्ण मोहन मिश्रा, झी मीडिया, बंगळुरू : लडाख (Ladakh) किंवा अरुणाचलच्या (Arunachal) पहाडी भागात दुश्मन लपून बसलाय. भारतीय लष्करी जवानांना (Indian Army Soldier) या शत्रू सैनिकांचा धोका आहे. अशावेळी अचानक भारतीय सैनिक हवेत उडू शकतात. आणि वरच्या भागात लपून बसलेल्या शत्रू सैन्याचा खात्मा करतात. सध्या तरी ही केवळ कल्पना आहे. मात्र भारतीय लष्कर वेगानं अत्याधुनिक रूप धारण करतंय. आणि त्याचाच एक भाग असणाराय, 'जेट पॅक सूट' (Jet Pack Suit).
बंगळुरूत (Bangalore) सध्या सुरू असलेल्या एरो इंडिया शोमध्ये (Aero India Show) हे जेट पॅक सूट उपलब्ध आहेत. भविष्यात भारतीय लष्करी जवान या सूटचा वापर करून हवेत उडू शकणार आहेत. हा असा सूट आहे, जो घातला की माणूस थेट जेट होऊ शकतो. गॅस टर्बाईन इंजिनच्या (Gas Turbine Engine) सहाय्यानं तो 10 ते 15 मीटर हवेत उडू शकतो. शत्रूवर अचानक हल्ला चढवण्यासाठी अशा जेट सूटची मोठी मदत होऊ शकते.
सूटचं वैशिष्ट्य काय?
या सूटचं वजन सुमारे 40 किलोग्रॅम इतकं आहे. हा सूट घालून तो कधीही उडू शकतो आणि जमिनीवर लँडिंग करू शकतो. जेटपॅक सूट घालून सैनिक 50 किलोमीटर प्रति तास वेगानं एका जागेवरून दुसऱ्या जागी उडत जाऊ शकतात. भारतीय लष्करानं हे जेटपॅक सूट खरेदी करण्यासाठी पहिली ऑर्डर दिली आहे.
या जेट पॅक सूटमुळं सीमा भागात, दुर्गम डोंगराळ भागात तसंच जंगलामध्ये गस्त घालणं सोपं होणारा आहे. सूटचा कंट्रोल दोन्ही हातांमध्ये असतो. सूट घालून सध्या जवान फक्त उडू शकतात. हवेत उडताना जवान प्रतिहल्ला करू शकत नाहीत मात्र भविष्यात जवानांना हवेत असतानाच प्रतिहल्ला करणं शक्य व्हावं, यादृष्टीनं सुधारणा केल्या जात आहेत.
आयर्न मॅनसारखं (Iron Man) भारतीय सैनिक आता हवेत उडू शकणार आहेत. यामुळं सैनिकांचं मनोबल वाढणाराय आणि शत्रूच्या मनात धडकी भरणार हे नक्की.