चारा घोटाळा : लालू प्रसाद यादव यांना आज सुनावली जाणार शिक्षा
चारा घोटाळ्या दोषी ठरलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावली जाणार आहे.
नवी दिल्ली : चारा घोटाळ्या दोषी ठरलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावली जाणार आहे.
लालूंसह १६ जण दोषी
लालू यांच्यासहीत १६ जणांना २३ डिसेंबरला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने चारा घोटाळ्यात दोषी ठरवले होते. पोलिसांनी त्याच दिवशी सर्वांची रवानगी रांची येथील बिरसा मुंडा सेंट्रल कारागृहात केली होती.
काय होते आरोप?
सीबीआय विशेष न्यायालयाने लालू यादव यांना फसवणूक करणे, कट रचणे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपा कलम ४२०, १२०-बी आणि पीसी अॅक्ट १३(२) नुसार दोषी ठरवले होते. १९९४ ते १९९६ दरम्यान देवघर जिल्हा कोषागारातून ८४.५ लाख रूपये काढले गेले होते.
सीबीआयने या प्रकरणात देवघर कोषागारातून खोटी बिल सादर करून पैसे काढण्यात आल्याचा आरोप सर्वांवर लावला होता. लालू प्रसाद यांच्यावर या प्रकरणाची माहिती असूनही याला आळा न घालण्याचा आरोप आहे.
लालूंना धक्का...
२३ डिसेंबरला रांचीच्या विशेष सीबीआय न्यायालयात लालूंच नाव पुकारण्यात आल्यावर त्यांनी कटघ-यात येऊन हात वर करून हजेरी दिली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना दोषी ठरवल्यावर ते सुन्न झाले होते. त्यानंतर डॉक्टर साहेब(जगन्नाथ मिश्र) ला सोडलं मला शिक्षा दिली...अजबच केलं...