भारतीय रेल्वेकडून Good News; आता मिनिटांमध्ये रद्द करता येईल PRS काउंटरवरून खरेदी केलेली तिकेटे

Indian railway: आता भारतीय रेल्वेने PRS काउंटरवरून घेतलेल्या तिकिटांना रद्द करण्याची प्रकिया अगदी सोपी केली आहे. यासाठी तुम्हाला IRCTC च्या वेबसाइटचा वापर करावा लागेल. मोजक्या क्लिक्सवर तुम्ही आता हे तिकिट रद्द करु शकता. काही पडताळणींनंतर तुमचे तिकीट रद्द होईल. त्याशिवाय तिकिटाचे रिफंड देखील मिळवू शकता.
How to cancel train ticket: रेल्वे प्रवास अधिक सोपा करण्यासाठी भारतीय रेल्वे ऑनलाइन सुविधा देत आहे. यामुळे तिकीट बुकिंग आणि रद्द करण्याची प्रक्रीया अधिक सोप्पी होत आहे. अनेक प्रवासी IRCTC च्या वेबसाइट किंवा अॅपद्वारे ऑनलाइन तिकीट बुक करतात. ही तिकिटे रद्द करण्यासाठी पुन्हा तिकिटांच्या खिडकीवर जावे लागत होते. पण, आता PRS काउंटरवरून घेतलेले तिकीटही ऑनलाइन रद्द करता येणार आहे. त्यामुळे कोणत्याही आपातकालीन परिस्थतित तुम्ही PRS काउंटरवर न जाता तिकिटे रद्द करु शकता.
PRS काउंटरवरून घेतलेले तिकीट रद्द कसे करावे?
जर तुम्ही PRS काउंटरवरून तिकीट खरेदी केले असेल आणि ते रद्द करायचे असेल, तर खालील प्रक्रिया करा.
1. IRCTC ची अधिकृत वेबसाइट उघडा
https://www.operations.irctc.co.in/ctcan/SystemTktCanLogin.jsf
2. 'Cancel Ticket' या पर्यायावर क्लिक करा.
3. 'Cancel Counter Ticket' हा पर्याय निवडा.
4. तुमचा PNR नंबर आणि ट्रेन नंबर टाका.
5. सिक्युरिटी कोड येईल, ते इंग्रजी अक्षर नीट भरा.
6. तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबरवर OTP येईल, जो तुम्ही तिकीट बुक करताना दिला होता.
7. तो OTP रकान्यामध्ये भरा आणि सबमिट करा.
8. नंतर, एक डायलॉग बॉक्स दिसेल, जिथे तुम्हाला प्रवाशांची माहिती दिसेल.
9. तिकीट रद्द करण्यासाठी 'Submit' वर क्लिक करा.
10. तुमचे तिकीट यशस्वीपणे रद्द होईल.
रिफंड कसा मिळवणार?
रिफंड मिळवण्यासाठी जवळच्या PRS काउंटरवर जावे लागेल. जर तुम्ही PRS काउंटरवरून तिकीट खरेदी केले असेल, तर रिफंड मिळवण्यासाठी निकटच्या PRS काउंटरवर जाऊन तिकीट जमा करा.
रेल्वेच्या नियमांनुसार
कन्फर्म तिकीटसाठी, ट्रेनच्या येण्याच्या 4 तास आधी PRS काउंटरवर जाऊन तिकीट रद्द करावे लागेल.
RAC किंवा वेटिंग लिस्ट तिकीटसाठी, ट्रेन सुटण्याच्या 30 मिनिटांपूर्वी PRS काउंटरवर जाऊन रिफंड मिळवता येईल.
टीप: कधीही OTP शेअर करण्यापुर्वी वेबसाइटची सत्यता तपासा.