'या' ट्रेन दाखवतात स्वर्गासारखे सुंदर नजारे! चहाच्या बागा, तलाव, पर्वत आणि समुद्राचे मनमोहक दृश्य सगळंच बघायला मिळेल

Most Beautiful Train Journey: या अतिशय सुंदर रेल्वे मार्गांवर प्रवास करताना, तुम्ही चहाचे मळे, समुद्रकिनारे, घनदाट जंगले आणि ऐतिहासिक स्थळांमधून जाता. चला जाणून घेऊया अशाच काही सर्वोत्तम रेल्वे मार्गांबद्दल  

तेजश्री गायकवाड | Jan 30, 2025, 16:13 PM IST

Most Beautiful Train Journey: या अतिशय सुंदर रेल्वे मार्गांवर प्रवास करताना, तुम्ही चहाचे मळे, समुद्रकिनारे, घनदाट जंगले आणि ऐतिहासिक स्थळांमधून जाता. चला जाणून घेऊया अशाच काही सर्वोत्तम रेल्वे मार्गांबद्दल

 

1/10

Most Beautiful Train Journey:  जर तुम्हालाही ट्रेनचा प्रवास आवडत असेल तर आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात सुंदर रेल्वे प्रवासाबद्दल सांगणार आहोत. होय, या अतिशय सुंदर रेल्वे मार्गांवर प्रवास करताना, तुम्ही चहाचे मळे, समुद्रकिनारे, घनदाट जंगले आणि ऐतिहासिक स्थळांमधून जाता. चला जाणून घेऊया अशाच काही सर्वोत्तम रेल्वे मार्गांबद्दल...   

2/10

जर तुम्हाला ट्रेनने प्रवास करायला आवडत असेल तर तुम्ही तर मेट्टुपालयम ते उटी हा प्रवास तुमच्या बकेट लिस्टमध्ये नक्कीच असावा. ही युनेस्को लिस्टेड टॉय ट्रेन आहे, जी तुम्हाला निलगिरी हिल्सवर घेऊन जाईल. या प्रवासात तुम्हाला हिरवेगार चहाचे मळे, घनदाट जंगले आणि सुंदर धबधब्यांमधून जाल.

3/10

बंगलोर ते गोकर्ण मार्गावर ट्रेनने प्रवास करा. कारवार एक्स्प्रेसमध्ये चढा आणि वाटेत हिरवीगार जंगले, कॉफीचे मळे आणि समुद्राच्या नयनरम्य दृश्यांचा आनंद घ्या.

4/10

बेंगळुरू ते कन्याकुमारी या रेल्वे प्रवासात तुम्ही ताडाच्या झाडांनी वेढलेल्या सुंदर दृश्यांमधून कन्याकुमारीला जाल. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर तिथे एकत्र येतात. हा प्रवास एक उत्तम अनुभव असेल.

5/10

मुंबई ते मडगावला जाण्यासाठी तुम्हाला मुंबईहून कोकण रेल्वेने जावे लागेल. हा प्रवास तुम्हाला पूल, बोगदे आणि घनदाट जंगलांमधून घेऊन गोव्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांवर पोहोचेल.

6/10

वर्कला ते कन्याकुमारी, वर्कलाच्या रंगीबेरंगी समुद्रकिनाऱ्यापासून ते कन्याकुमारीच्या आध्यात्मिक आणि नैसर्गिक सौंदर्यापर्यंतचा हा प्रवास एक अविस्मरणीय अनुभव असेल. या प्रवासात तीन समुद्र कसे एकत्र येतात हे पहायला मिळेल आणि वाटेत अनेक ऐतिहासिक मंदिरेही पाहायला मिळतील.  

7/10

चेन्नई ते रामेश्वरम मार्गाची सर्वात खास गोष्ट म्हणजे बंगालच्या उपसागरावर बांधलेला पंबन पूल. हा भारतातील सर्वात सुंदर रेल्वे पुलांपैकी एक आहे. या प्रवासात तुम्हाला निळा समुद्र, समुद्राची झुळूक आणि धार्मिक स्थळाकडे वाटचाल असा अद्भुत अनुभव मिळेल.

8/10

जर तुम्हाला ट्रेनच्या शांत प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर कोची ते मडगाव समुद्रकिनारे हा प्रवास योग्य असेल. वाटेत तुम्हाला सुंदर सागरी शहरे आणि हिरवाईने वेढलेली गावे दिसतील.  

9/10

चेन्नई-हैदराबाद एक्सप्रेस तुम्हाला हैदराबाद या ऐतिहासिक शहरात घेऊन जाईल. येथे तुम्ही गोलकोंडा किल्ला, चौमहल्ला पॅलेस आणि इतर ऐतिहासिक ठिकाणांचा आनंद घेऊ शकता.  

10/10

वास्को-द-गामापासून लांडाचा प्रवास गोव्यापासून कर्नाटकच्या जंगलांपर्यंत आहे. देशातील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक दूधसागर धबधबा येथे तुम्ही पाहू शकता. या प्रवासात घनदाट जंगले आणि वन्यप्राण्यांनी भरलेल्या परिसरातून जाण्याचा थरारही असेल.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x