EPFO खात्यामध्ये `असा` करा IFSC कोड अपडेट, जाणून घ्या सोपी पद्धत
EPFO खात्यामध्ये IFSC कोड अपडेट करायची आहे, `या` सोप्या पद्धतीने घरच्या घरी करून घ्या
How to update IFSC Code in EPFO: देशातील नोकरदार वर्गाला आर्थिक सुरक्षा देण्यासंदर्भात EPFO द्वारे अनेक सुविधा दिल्या जातात. EPFO च्या माध्यमातून नोकरदार वर्गाच्या पगारातला काही भाग हा ईपीएफओ खात्यात जमा होतो आणि त्यामध्ये आपल्या पगारातल्या भागा ईतकीच रक्कम कंपनीकडून देखील जमा केली जाते. EPFO च्या खात्यात जमा असणाऱ्या रक्कमेवर जे व्याज मिळतं ते भारतातील बँकांच्या तुलनेनं जास्त आहे. तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा तु्म्ही EPFO चा पैसा वापरु शकता. यासाठी तुमचं EPFO च्या अकाउंटसंदर्भातील माहिती अपडेटेड असायला हवी. EPFO च्या अकाउंटसंदर्भात एक महत्वाचा घटक म्हणजे IFSC कोड. आयएफसी कोडला EPF अकाउंटमध्ये कसं अपडेट करायचं याबद्दल जाणून घेऊया...
EPF अकाउंटमध्ये असा करा IFSC कोड अपडेट...
- सर्वप्रथम EPFO च्या अधिकृत वेबसाइटला म्हणजेच https://www.epfindia.gov.in/site_en/index.php भेट द्या.
- वेबसाईटच्या होम पेजवरील 'Services' नावाच्या टॅबला क्लिक करा.
- 'Services' वर क्लिक केल्यानंतर For Employees या पर्यायावर क्लिक करा.
- For Employees वर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल. या पेजच्या खालच्या बाजूला 'Services' सेक्शनमध्ये Member UAN/Online Service (OCS/OTCP) वर क्लिक करा.
- तुमचा 12 अंकी UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाईप करुन लॉग इन करा. अकाउंट लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला Manage टॅबवर क्लिक करा आणि त्यानंतर पुढे KYC वर क्लिक करा.
- तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला बँक, पॅन, पासपोर्टचे पर्याय दिसतील. त्यापैकी Bank वर क्लिक करा.
- तुमचा अकाउंट नंबर आणि नवीन IFSC कोड टाईप करा. यानंतर, तुमच्या बँकेच्या नवीन शाखेचे डिटेल्स स्क्रीनवर दिसतील. त्यानंतर Save वर क्लिक करा.
- Save वर क्लिक केल्यानंतर तुमचे डिटेल्स पडताळले जातील. यासाठी काही दिवसांचा कालावधी लागू शकतात. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, तुमच्या बँकेच्या नवीन शाखेचा IFSC कोड तुमच्या EPFO खात्यामध्ये अपडेट केला जाईल