फक्त या 6 टिप्स करा फॉलो आणि दिसा अभिनेत्रींप्रमाणे स्टायलिश
कोणत्याही फंक्शन साठी तुम्ही याची निवड करू शकता यावर हिल्स ,किंवा फ्लॅट्स फूटवेअर घालू शकता त्याचसोबत व्हाईट स्नीकर्स च कॉम्बिनेशन हि भन्नाट दिसेल
लाईफस्टाईल कितीही बिझी असो पण ट्रेन्डसोबत स्वतःला ग्रूम करणं हेही तितकंच महत्वाचं आहे आपण स्टायलिश आणि परफेक्ट लुकमुळे आपण छान तर दिसतोच पण आत्मविश्वाससुद्धा वाढायला मदत होते.
काही फॅशन ट्रेंड्स आहेत जे तुम्ही फॉलो केलेत तर सगळ्यांपेक्षा हटके आणि स्टायलिश लुक तुम्हाला मिळू शकतो आणि त्याचसोबत तुम्ही अभिनेत्रींनप्रमाणे फॅशनेबल दिसू शकता
प्लाझो पँट्स
सध्या या फॅशन ची चालती आहे तुमच्या वॉर्डरोब मधेय पलाझो पँट्स नक्की ठेवा.. पलाझो पँट्सवर एखादा कॅजुअल टॉप किंवा ट्रॅडिशनल कुर्ती घालून तुमचा लुक चेंज करू शकता.
मॅक्सी ड्रेस
हा पोशाख सगळ्यात आरामदायी आहे कोणत्याही सीझनमध्ये हा पेहराव खूप ट्रेंड मध्ये आहे. कोणत्याही फंक्शन साठी तुम्ही याची निवड करू शकता यावर हिल्स ,किंवा फ्लॅट्स फूटवेअर घालू शकता त्याचसोबत व्हाईट स्नीकर्स च कॉम्बिनेशन हि भन्नाट दिसेल आणि हा पेहराव कोणत्याही बॉडी टाईप साठी सुटेबल आहे
शॉर्ट्स
शॉर्ट्स ऑल टाइम इन फॅशन आहे ,यावर टॅंक टॉप,क्रॉप टॉप किंवा शर्ट तुम्हाला खूप चॅन लुक देईल यासोबत तुम्ही चान्स शूज पेअर करून हटके लुक करू शकता
जम्पसूट,प्लेसूट
हा ड्रेस पॅटर्न जितका स्टायलिश दिसतो तितकाच आरामदायी आणि फॅशनेबल आहे ..
इंडियन कुर्ती
जर तुम्ही ट्रॅडिशनल वेअर पसंत करत असाल हा गेटअप तुम्ही कराच,कुर्तीसोबत लेगिन्स किंवा जीन्स घालून तुम्ही या लुक ला हटके टच देऊ शकता यासोबत तुम्ही लॉन्ग झुमका एअर रिंग घालून आणखी सुंदर दिसू शकता
स्कर्ट
प्रत्येकीच्या वॉर्डरोबमध्ये आपल्या बॉडी शेपनुसार स्कर्टच कलेक्शन असायला हवं.. स्कर्ट तुम्ही ऑफिस किंवा नॉर्मल आउटिंगसाठी घालू शकता हा लुक तुम्हाला हटके दिसायला मदत करतो...स्कर्ट वर तुम्ही फॉर्मल शर्ट आणि ब्लेझर घालून ऑफिस लुक करू शकता. कॅज्युअल लूकसाठी स्कर्टवर टी शर्ट घालू शकता.