मुंबई : चांगल्या आरोग्यासाठी लोकं चरबीयूक्त पदार्थ आणि तेलाचे पदार्थ खाणे टाळतात. त्यामुळे जर एखाद्यावेळेस जेवणात तेल जास्त झाले तर त्याला काही पर्याय नसतो. तुम्ही पाहूण्यांच्या घरी गेलात, तर तेलकट पदार्थ जसे, पुरी, वडे, पापड बनवले जातात. त्यामुळे अशा वेळी लोकांना ते मजबूरीने ते खावे लागते. काही लोकं त्या खाण्याच्या पदार्थातील तेल कमी करण्यासाठी टीशू पेपर किंवा टॉवेल वापरतात. भाजीतील तेल कमी करण्यासाठी काही लोकं वरचं तेल ओतून टाकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती एका ट्रिकने भाजीवर तरंगत असलेलं तेल बाजूला काढत आहे. त्यात आश्चर्याची गोष्ट अशी की, हा व्यक्ती अगदी काही सेकंदातच तेलाल या भाजीतून वेगळं करत आहे.



या व्यक्तीच्या इनोव्हेशन ट्रिकला सगळ्यांकडून खूप पसंती मिळत आहे. हा इनोवेशन सोशल मीडियावर सगळ्याच लोकांची मनं जिंकत आहे. कारण फक्त बर्फाच्या मदतीने हा व्यक्ती अगदी काही सेकंदात भाजीतून तेल काढत आहे. असे केल्याने अन्नाचा नाश पण होत नाही आणि अगदी कमी वेळात हे काम होते.


तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता की, एका भांड्यात तेलाचा तरंग असलेली भाजी आहे. खरेतर बऱ्याच लोकांनी अशी तरी वाली भाजी किंवा मिसळ वैगरे खायला आवडते. परंतु काही लोकांना ते आवडत नाही. असे लोकं ही ट्रिक घरी वापरुन पाहू शकतात.


खरेतर भांड्यातून तेलाचा तरंग काढण्यासाठी तो व्यक्ती बर्फ वापरतो. बर्फाच्या गोळ्याला तो भाजीच्या पुष्ठ भागावर पकडतो आणि त्यामुळे भाजीवरील तेल त्या बर्फावर गोठतो आणि काही सेकंदात बर्फाच्या सहाय्याने तेल बाहेर काढले जाते. ती व्यक्ती ही क्रिया सारखी सारखी करतो आणि भजीतील सगळं तेल काढण्याचा प्रयत्न करतो.


सोशल मीडियावर देखील या व्हिडीओला चांगलीच पसंती दर्शवली जात आहे. लोकं या व्यक्तीच्या यूक्तीचे कौतुक करत आहेत.