Viral Video: अरे करतोय काय? एक नाही, दोन नाही, चक्क 3 वेळा... फुटबॉलच्या मैदानावर खेळाडूचा गेम!
football player is seen hitting opposing player: सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये फुटबॉल स्टेडियमच्या (football stadium) आत मैदानावर दोन संघांमध्ये भिडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये असं दिसून येतंय की...
Football Player Viral Video: अर्जेंटिनाने (Argentina) फिफा कप (fifa world cup 2022) उचलला असला तरी अनेकांच्या डोक्यातून फुटबॉलचं फ्याड गेल्याचं दिसत नाही. फिफाच्या अंतिम सामन्याचा थरार पाहिल्यानंतर अनेकांना फुटबॉलविषयी (Football) उत्सुकता निर्माण झाली आहे. अशाच नव फुटबॉलप्रेमींसाठी एक व्हिडीओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घातला असल्याचं दिसतंय. (football player is seen hitting opposing player three times in a row Video goes Viral marathi news)
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये फुटबॉल स्टेडियमच्या (football stadium) आत मैदानावर दोन संघांमध्ये भिडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये असं दिसून येतंय की, सामन्यादरम्यान एक खेळाडू गोल करण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरा खेळाडू त्याला थांबवताना दिसत आहे.
सामना रोमांचक स्थितीत जात असताना एक खेळाडू गोल करण्याच्या प्रयत्नात असतो. त्यावेळी तो थेट नेटवर निशाणा लगावतो. मात्र, फुटबॉल डिफेन्ड (Defender) करणाऱ्या खेळाडूला लागतो. बॉल लागल्याच क्षणी तो खाली पडतो. त्यानंतर स्टाईकर (Striker) दुसरा प्रयत्न करतो. त्यावेळी देखील बॉल त्याच खेळाडूला पुन्हा लागतो. दुसऱ्यांदा बॉल लागल्यानंतर डिफेन्डर सहन झालं नाही अन् तो भर सामन्यात कोसळतो.
पाहा Video -
दरम्यान, फुटबॉल पुन्हा त्याच स्टाईकर जवळ येतो आणि तो पुन्हा तिसरा प्रयत्न (football player is seen hitting opposing player) करतो. यावेळी गोल जाईल, अशी अपेक्षा असताना स्टाईकर गोल मारण्याऐवजी बॉल पास करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी पुन्हा तोच डिफेन्डर मधोमध असतो आणि त्याला पुन्हा फुटबॉल लागतो. त्यानंतर पंच (football referee) शिट्टी वाजवतो आणि सामना काही वेळासाठी थांबवतो.