नवी दिल्ली : कोरोनामुळे 2020 या वर्षात अनेक व्यवसायांसोबतच शिक्षण क्षेत्रालाही मोठं नुकसान होत आहे. मार्च महिन्यापासून देशातील शाळा, कॉलेजेस बंद आहेत. तर अनेक ठिकाणी कोरोनामुळे वार्षिक परीक्षाही पूर्ण होऊ शकल्या नाहीत. जून महिन्याच्या मध्यापर्यंत शाळा, कॉलेजस पुन्हा सुरु होतात. परंतु यंदा कोरोनाचं संकट कधी संपेल आणि पुन्हा शाळा, कॉलेजेस कधी सुरु होतील याबाबत कोणतीची निश्चिती नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात शाळा, कॉलेज सुरु करण्यासाठी सरकारने योजना आखण्यास सुरुवात केली आहे. सध्या सरकारकडून, मुलाच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, अशा प्रकराची कोणतीही पावलं उचलण्यास इच्छित नाही. परंतु कोरोनाची परिस्थिती आणि त्याला सामोरं जाण्याची तयारी आणि विशेषत: त्यापासून मुलांना संरक्षण देण्यासाठी सर्व उपाययोजना राबवूनच सरकार शाळा पुन्हा सुरु करण्याच्या दिशेने कोणतेही पाऊल उचलणार आहे.


काही रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार आता हळू हळू पुन्हा शाळा-कॉलेज सुरु करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने सल्ला मागविला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने, राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना या संदर्भातील संभाव्य मुदतीबाबत निर्णय देण्यास सांगितलं आहे. तसंच शाळा-कॉलेज सुरु करण्यापूर्वी पालकांचं मत घ्यावं असेही निर्देश दिले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या (एचआरडी) शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने, 20 जुलैपर्यंत प्रतिक्रिया देण्याचं सांगितलं आहे.


कोविड-19मुळे मार्चपासून शाळा-कॉलेज बंद आहेत. कोरोना संकटामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात सरकारने 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय अभ्यासक्रम 30 टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाने म्हटलं आहे की, या संसर्गामुळे शाळा-कॉलेजेसचा बराच वेळ वाया गेला आहे आणि अशा काळात मुलांवर जास्त भार टाकता येणार नाही, त्यामुळे अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.