नवी दिल्ली :  देशात कितीही गरीबी असली तरी श्रीमंतांकडे किती संपत्ती आहे याची उत्सुकता प्रत्येकाला असतेच. जगातील श्रीमंताची यादी समोर आली आहे. यावरून आपल्या देशात किती श्रीमंत आहेत, त्यांचा जगाच्या क्रमवारीत किती नंबर लागतो यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत असलेले मुकेश अंबानी आता अब्जाधिशांच्या रांगेत जाऊन बसले आहेत. फोर्ब्स मॅगझिनमध्ये जगातील अब्जाधिशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मुकेश अंबानी सहाव्या स्थानाहून तेराव्या स्थानी पोहोचले आहेत. ई कॉमर्स सेक्टरमधील मोठी कंपनी अमेझॉनचे संस्थापक, 55 वर्षांचे जेफ बेजोस श्रीमंतांच्या यादीत पहिल्या नंबरावर आहेत. त्यांच्यानंतर बिल गेट्स आणि वॉरेन बफेट यांची नावे येतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


2018 मध्ये मुकेश अंबानी (61 वर्ष) यांची संपत्ती 40.1 अब्ज डॉलर इतकी होती. या संपत्तीत आता वाढ होऊन 50 अरब डॉलर इतकी झाली आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये ते 19 व्या स्थानी होते. याआधी 2017 च्या फोर्ब्सच्या यादीत अब्जाधिशांमध्ये मुकेश अंबानी 33 व्या स्थानी होतो. 


 मुकेश यांचे भाऊ अनिल अंबानी श्रीमंतांच्या यादीत 1349 व्या स्थानी आहेत. जेफ बेजोस यांची गेल्या वर्षीची संपत्ती 19 अब्ज डॉलर इतकी वाढून 131 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. 


फोर्ब्सच्या यादीतील भारतीय 


फोर्ब्सच्या यादीमध्ये भारतातील 106 अब्जाधिश असून यामध्ये मुकेश आधी सर्वात पुढे आहेत. विप्रोचे चेअरमन अजीम प्रेमजी यांची संपत्ती 22.6 अब्ज डॉलर असून या यादीत ते 36 व्या स्थानी आहेत. एचसीएलचे सहसंस्थापक शिव नाडर 82 व्या स्थानी आणि आर्सेलर मित्तलचे चेअरमन आणि सीईओ 91 व्या स्थानी आहेत. 


यासोबतच जागतिक अब्जाधिशांच्या यादीत भारतच्या आदित्य बिर्ला समुहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला 122 व्या स्थानी, अदानी समुहाचे अध्यक्ष आणि संस्थापक गौतम अदानी 167 व्या स्थानी, भारतीय एअरटेलचे प्रमुख सुनील मित्तल 244 व्या स्थानी, पतंजलि एंटरप्राईजचे अध्यक्ष अजय पीरामल 436 व्या स्थानी, इन्फोसिसचे सहसंस्थापक किरण मजूमदार-शॉ 617 व्या स्थानी, इन्फोसिसचे सह संस्थापक एनआर नारायण मूर्ति 962 व्या स्थानी आणि आरकॉमचे चेअरमन अनिल अंबानी 1349 व्या स्थानी आहेत.