मुंबई : फोर्ब्स मॅगझीननं २०१७ ची सर्वात श्रीमंत १०० भारतीयांची यादी जाहीर केलीय. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती जवळपास ३८ बिलियन डॉलर आहे... तर या लिस्टमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर अनुक्रमे 'विप्रो'चे चेअरमन अजीम प्रेमजी आणि हिंदुजा ब्रदर्स आहेत. 


अजीम प्रेमजी यांची संपत्ती जवळपास १९ बिलियन डॉलर आहे तर हिंदुजा ब्रदर्सची संपत्ती १८.४ बिलियन डॉलर आहे.


फोर्ब्सची यादी...


१. मुकेश अंबानी (रिलायन्स इंडस्ट्रीज) संपत्ति - ३८ बिलियन डॉलर


२. अजीम प्रेमजी (विप्रो) संपत्ती - १९ बिलियन डॉलर


३. हिंदुजा ब्रदर्स (अशोक लेलँड) संपत्ती - १८.४ बिलियन डॉलर


४. लक्ष्मी मित्तल (आर्सेलर मित्तल) संपत्ती - १६.५ बिलियन डॉलर


५. पल्लोनजी मिस्त्री (शापोरजी पल्लोनजी ग्रुप) संपत्ती - १६ बिलियन डॉलर


६. गोदरेज फॅमिली (गोदरेज ग्रुप) संपत्ती - १४.४ बिलियन डॉलर


७. शिव नादर (एचसीएल टेक्नोलॉजीज) संपत्ती - १३.६ बिलियन डॉलर


८. कुमार बिडला (आदित्य बिड़ला ग्रुप) संपत्ती - १२.६ बिलियन डॉलर


९. दिलीप संघवी (सन फार्मास्यूटिकल इंडस्ट्रीज) संपत्ती - १२.१ बिलियन डॉलर


१०. गौतम अदाणी (अदाणी पोर्ट अॅन्ड सेज) संपत्ती - ११ बिलियन डॉलर


या यादीत सर्वात श्रीमंत भारतीय म्हणून ब्रिटानियाच्या नुसली वाडिया यांनी एन्ट्री घेतलीय. ७३ वर्षांच्या वाडियांची एकूण संपत्ती ५.६ बिलियन डॉलर आहे. 


तसंच या यादीत सर्वात कमी वयाचे अरबपती ठरलेत विजय शेखर शर्मा... 'पेटीएम'चे मालक असलेले ३९ वर्षांच्या शर्मांची एकूण संपत्ती १.४७ बिलियन डॉलर आहे. तर सर्वात जास्त वयाचे अरबपती आहेत संप्रदा सिंह. अल्कम लेबोरेटरीजचे मालक असलेले सिंह ९१ वर्षांचे आहेत. त्यांची एकूण संपत्ती ३.३ बिलियन डॉलर आहे.