गुवाहाटी : आसामचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे (Congress Leader) ज्येष्ठ नेते तरुण गोगई (Tarun Gogoi) यांचे गुवाहाटी येथे आज उपचारांदरम्यान निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. कोरोना बाधा झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर गुवाहाटी मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवल्याने त्यांचा कोरोनाविरोधातील (Corona) लढा अयशस्वी ठरला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोगई यांच्या निधनाबाबत राज्याचे आरोग्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी माहिती दिली. आज सकाळी गोगई यांची प्रकृती खालावल्याने राज्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आपला नियोजित कार्यक्रम रद्द दिब्रुगढ येथून ते गुवाहाटी येथे निघाले होते. तरुण गोगोई हे 25 ऑक्टोबरला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. कोरोनावर मात केल्यानंतर 2 नोव्हेंबरला त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. तेव्हापासून गोगोई यांच्यावर GMCH रुग्णलयात उपचार सुरु आहेत. तरुण गोगोई हे 2001 ते 2016 पर्यंत सलग तीन वेळा आसामचे मुख्यमंत्री राहिले आहेत.



आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे वयाच्या 84 व्यावर्षी निधन झाले. आसामध्ये ते 2001 ते 2016 पर्यंत सत्तेत होते. सलग तीन टर्म सत्तेत असणाऱ्या गोगोई यांची राजकीय कारकीर्द पन्नास वर्षांपेक्षा जास्त होती. तरुण गोगोई यांनी काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम केले आहे. 



आसाम विधानसभेच्या 2021 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपविरोधात विरोधी पक्षांची आघाडी तयार करण्याचा तरुण गोगोईंचा प्रयत्न होता. तरुण गोगोईंच्या नेतृत्वात काँग्रेसनं आसमाममध्ये 2001, 2006 आणि 2011 मध्ये विजय मिळवला होता. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत तरुण गोगोई तिटाबार विधानसभा मतरादसंघातून विजयी झाले पण काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला होता.