राम रहीमने ३०० साध्वींवर बलात्कार केल्याचा गौप्यस्फोट
बलात्कार प्रकरणी बाबा राम रहीम याला सीबीआय विशेष कोर्टाने २० वर्षांची शिक्षा सुनावली. त्याच्यावर दोन साध्वींनी बलात्कार केल्याचा आरोप केला होता. प्रत्येक गुन्ह्यात १०-१० वर्षे, याप्रमाणे त्याला २० वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
चंडीगढ : बलात्कार प्रकरणी बाबा राम रहीम याला सीबीआय विशेष कोर्टाने २० वर्षांची शिक्षा सुनावली. त्याच्यावर दोन साध्वींनी बलात्कार केल्याचा आरोप केला होता. प्रत्येक गुन्ह्यात १०-१० वर्षे, याप्रमाणे त्याला २० वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
शिवाय त्याला ३० लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणादरम्यान त्याच्याबद्दलचे अनेक नवीन खुलासे समोर येत आहेत.
राम रहीम याच्या माजी सुरक्षा रक्षकाने आता मोठा खुलासा केला आहे. राम रहीमच्या माजी सुरक्षा रक्षकाने ‘टाईम्स नाऊ’शी बोलताना गंभीर आरोप आणि काही गौप्यस्फोट केले आहेत. राम रहीमने जवळपास ३०० साध्वींवर बलात्कार केल्याचं त्याने म्हटलं आहे.
इतकंच नाही तर शेकडो तरुणांना बाबाने नपुंसक केलं. शिवाय आश्रमात किती लोकांच्या हत्या झाल्या, याचा हिशेब ठेवणं कठीण असल्याचं म्हटलं आहे. बाबाने स्वत:च्या नावात लावलेल्या सगळ्या पदवी खोट्या असल्याचंही माजी सुरक्षा रक्षकाने म्हटलं आहे. त्यामुळे आता राम रहीम याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.