मुंबई : टाटा उद्योग समूहाकडून काही वर्षांपूर्वी भारतातील सर्वाधिक मोठा वर्ग असणाऱ्या सर्वसामान्यांसाठी TATA NANO ही कार सर्वांच्या भेटीला आणली गेली. अतिशय कमी वेळात या कारला मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली. मुंबईसह इतरही काही ठिकाणच्या रस्त्यांवर नॅनोच धावू लागली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नावाप्रमाणेच आकाराने लहान असणारी ही कार सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत टाटा समूहाकडून देण्यात आल्यामुळे 'अब जमाना नॅनो का है' असं म्हणत या कारला अनेकांनीच कमालीची पसंती दिली. या कारची कल्पना सुचण्यामागेही एक किस्सा आहे. जो खुद्द Ratan Tata रतन टाटा यांच्याच आठवणीतील आहे. 


'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या मुलाखतीत टाटा उग्योगसमूहाचे सेवानिवृत्त संचालक रतन टाटा यांनी नॅनोची 'नॅनो कहाणी' सांगितली. कायमच समाजातील सर्वच स्तरांचा विचार करणाऱ्या रतन टाटा यांना त्यांच्या याच सवयीमुळे या कारची कल्पना सुचली. याचविषयी सांगताना त्यांनी एका प्रसंगाची माहिती दिली. 


'मला आठवतंय मुंबईच्या मुसळधार पावसामध्ये मी एका मोटरबाईकवर (दुचाकीवर) एकाच कुटुंबातील चार व्यक्तींना बसलेलं पाहिलं. कोणताही पर्याय नसल्यामुळे आपला जीव धोक्यात घालणाऱ्या याच कुटुंबासाठी खूप काही करायचं हे मला ठाऊक होतं', असं टाटांनी सांगितलं. डोक्याच आलेल्या याच विचाराला चालना मिळाली. नॅनो आकारास आली. पण,  या कारचं अनावरण होईपर्यंत किंमत वाढली होती. असं असलं तरीही आपण दिलेला शब्द राखत टाटा यांनी त्या कारच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही.




पाहा : हॉलिवूड किंवा बॉलिवूड स्टार नव्हे; हे आहेत विश्वविख्यात उद्योपती


आपल्या कंपनीकडून सर्वसामान्यांसाठी देण्यात आलेल्या या कारकडे आणि तिच्या निर्मितीकडे पाहिलं असता या निर्णयावर ठाम राहण्याचा आणि अर्थातच या कारचा आपल्याला प्रचंड अभिमान असल्याचं टाटा म्हणाले.