मुंबई : Ratan Tata रतन टाटा.... 'बस्स नाम ही काफी है'. असं म्हटलं तरीही अतिशयोक्ती होणार नाही. कारण, ज्याप्रमाणे उद्योग जगतात या व्यक्तीने देशाचं नाव उंचवलं आहे हे पाहता सर्वांनाच त्यांचा अभिमान वाटणं सहाजिक आहे. सोशल मीडिया म्हणू नका, अभियांत्रीकी क्षेत्रात शिक्षण घेऊ पाहणारी तरुण पिढी म्हणू नका, किंवा उद्योग क्षेत्रात देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने काम करणारे असंख्य चेहरे म्हणू नका. प्रत्येकासाठी रतन टाटा हे बहुविध कारणांनी प्रेरणास्त्रोत ठरले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या ते पुन्हा एकदा प्रकाशझोतात येण्यामागचं कारण म्हणजे सोशल मीडियावर त्यांच्या नावे शेअर करण्यात आलेली एक पोस्ट. ज्यामध्ये त्यांनी आपल्या खासगी आयुष्यासमवेत इतरांच्या जीवनशैलीविषयी असणारे त्यांचे विचारही सर्वांपुढे मांडले आहेत. 


स्वत:सोबतच साथीले असणाऱ्यांच्या जीवनशैलीचा स्तरही कसा उंचावला जाईल, याच प्रयत्नांत रतन टाटा असायचे. त्या दृष्टीने त्यांनी शक्य ते निर्णयही घेतले. असे हे रतन टाटा खासगी आयुष्याविषयीही ह्युमन्स ऑफ बॉम्बेशी संवाद साधनाता बरंच काही बोलून गेले. काही दिवसांपूर्वी HOBशीच संवाद साधताना त्यांनी आपल्या जीवनातील प्रेमाच्या नात्याविषयी सांगितलं होतं. यावेळी त्यांनी कशा प्रकारे आपण विवाहबंधनात अडकता अडकता राहिलो, याचाही खुलासा केला.


वाचा : अशी सुचली TATA 'नॅनो'ची कल्पना; वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान  


आपल्या जीवनाविषयी सांगताना काम, म्हणजे माझी जीवनशैली असं ते नेहमी सांगतात. 'मी एकतर बॉम्बे हाऊसमध्ये असायचो किंवा मग कुठल्यातरी दौऱ्यावर (फिरत) असायचो. म्हणूनच की काय, २-३ वेगवेगळ्या जोडीदारांशी माझ्या लग्नाची गोष्ट छेडली गेली. पण, ती पूर्णत्वास मात्र गेली नाही', असं टाटा यांनी सांगितलं. त्या मुलींनाच आपल्यासाठी बदलावं लागणार होतं, आपल्या जीवशैलीशी मेळ साधावा लागणार होता जे आपल्याला योग्य वाटत नसल्याची बाब लक्षात घेत अखेर टाटा यांचं लग्न झालंच नाही. 



सध्याच्या घडीला रतन टाटा हे टाटा उद्योगसमूहातून सेवानिवृत्त असले तरीही ते निवृत्तीनंतरचं आयुष्यही तितक्याच मनमुरादपणे जगत आहेत. मुळात आयुष्याकडे पाहण्याचा वेगळा आणि तितकाच सहजसोपा दृष्टीकोन टाटा सर्वांनाच देत आहेत.