शिवसेना, टीडीपी आधी हा पक्ष पडला एनडीएतून बाहेर
शिवसेना आणि चंद्रबाबू नायडू हे एनडीएमधून बाहेर पडणार अशा चर्चा असतांनाच त्याआधी एक वेगळेच नेते एनडीएममधून बाहेर पडले आहेत.
नवी दिल्ली : शिवसेना आणि चंद्रबाबू नायडू हे एनडीएमधून बाहेर पडणार अशा चर्चा असतांनाच त्याआधी एक वेगळेच नेते एनडीएममधून बाहेर पडले आहेत.
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतन राम मांझी यांनी एनडीएपासून संबंध तोडले आहेत. मांझी यांनी याआधी तेजस्वी यादव यांची भेट घेतली.
तेजस्वी आणि मांझी यांच्यात एका बंद खोलीत चर्चा झाली. जीतन राम मांझी अनेक दिवसांपासून एनजीएवर नाराज होते. जहानाबाद सीटवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत मांझी यांनी उमेदवारी मिळावी म्हणून इच्छा व्यक्त केली होती. पण त्यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगळवारी आरजेडी नेता भोला यादव यांनी जीतन राम मांझी यांनी खुली ऑफर दिली होती. यानंतर भेट झाली आणि मांझी यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.