नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजप नेते अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शुक्रवारी संध्याकाळी जेटली यांची प्रकृती बिघडली. हृदय आणि फुफ्फुसाच्या आजारामुळे त्यांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांनी एम्समध्ये जाऊन जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ९ ऑगस्टला जेटली यांना एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एम्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागात जेटली यांच्यावर उपचार सुरू आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या सरकारमध्ये अरुण जेटली हे केंद्रीय अर्थमंत्री होते. प्रकृतीच्या कारणामुळेच त्यांनी २०१९ मध्ये कोणतेही पद नको असल्याचे विनंती मोदी यांना केली होती. दरम्यान ९ ऑगस्ट रोजी त्यांना एम्स रुण्गालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले. काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अरुण जेटली यांची भेट घेतली.