पाटणा: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा माजी नेता कन्हैया कुमार याच्यावर बुधवारी हल्ला करण्यात आला. बिहारच्या सुपौल येथे कन्हैया प्रवास करत असलेल्या गाडीच्या ताफ्यावर तुफान दगडफेक करण्यात आली. यामध्ये कन्हैया कुमार जखमी झाल्याचे समजते. कन्हैया कुमार सुपौल येथील सभा आटोपून सहरसाच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला. यावेळी जमावाने गाड्यांवर तुफान दगडफेक केली. यामध्ये अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी शनिवारीदेखील बिहारच्या सारण जिल्ह्यात कन्हैया कुमारच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली होती. मात्र, त्यामधून कन्हैया सुखरुप बचावला होता. मात्र, आजच्या दगडफेकीवेळी कन्हैयाला दुखापत झाल्याचे समजते. ही दुखापत कितपत गंभीर आहे, याची माहिती अजून मिळू शकलेली नाही. 


'भाजप सगळं विकून टाकेल, देशात फक्त तुरुंग आणि डिटेन्शन कॅम्प उरतील'



नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूची (NRP) याविरोधात कन्हैया कुमार याने जन-गण-मन यात्रा काढली आहे. तब्बल महिनाभर चालणाऱ्या या यात्रेदरम्यान कन्हैया कुमार बिहारमधील प्रमुख शहरांना भेटी देणार आहे. यादरम्यान त्याच्या तब्बल ५० सभा होणार आहेत. बेतिया येथून ३० जानेवारीपासून जन-गण-मन यात्रेची सुरुवात झाली होती.


शाहीन बागेत शुभा मुद्गल यांच्या शास्त्रीय संगीताची मैफल; व्हीडिओ व्हायरल