डेहराडून : उत्तराखंडचे माजी मंत्री राजेंद्र बहुगुणा (५९) यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. राजेंद्र बहुगुणा हे हल्द्वानी रोजवेज युनियनचे नेते होते. तर बहुगुणा 2002 मध्ये एनडी तिवारी यांच्या सरकारमध्ये मंत्री होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी सकाळी राजेंद्र बहुगुणा घराच्या पाण्याच्या टाकीवर चढले. त्यानंतर त्यांनी तिथेच स्वतःवर गोळी झाडून घेतली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी स्वतः पोलिसांना फोन केला होता.


काही दिवसांपूर्वी राजेंद्र बहुगुणा यांच्या सुनेने त्यांच्यावर मोठा आरोप केला होता. तसेच, त्यांच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. आपल्या नातवाचा विनयभंग केल्याचा आरोप करत हा गुन्हा दाखल केला होता. या गंभीर आरोपानंतर माजी मंत्री राजेंद्र बहुगुणा दुखावले गेले होते.


या आरोपांनी व्यथित झाल्यामुळेच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. आपल्या वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्या मुलाने आपल्याच पत्नीवर केला आहे. त्यांच्या मुलाने पत्नीविरोधात तक्रार दिली आहे. त्याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार सुनेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, प्राथमिक तपासात आत्महत्येचे कोणतेही कारण समोर आले नाही असे पोलिसांनी सांगितले.