नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राजकीय विश्वास वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाच्या समारोप नागपूरमध्ये सात जूनला आयोजित करण्यात आलाय. यासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निमंत्रण देण्यात आलंय. त्यांनी ते स्वीकारलं असून ते हजर राहणार आहेत.  नागपूरच्या रेशीमबाग येथील स्मृती मंदिर जवळील मैदानात हा कार्यक्रम होणार असून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत देखील संबोधित करणार आहेत. प्रणव मुखर्जी यांना उपस्थितीबाबत दुजोरा देण्यात आलाय. आरएसएसच्या या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी हजर राहणार असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.