नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत... त्यांच्या मूत्रमार्गामध्ये संसर्ग झाल्याची माहिती आहे. वाजपेयींची प्रकृती स्थिऱ असल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलंय. दरम्यान, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शाह,  केंद्रीयमंत्री जे पी नड्डा आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी वाजपेयींची भेट घेतली. वाजपेयी पुढील काही काळ निरीक्षणाखाली राहणार असल्याची माहिती एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी दिलीय.  


सोमवारी वाजपेयी यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एम्स रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर मात्र भाजप नेत्यांची एकच धावपळ सुरू केली... त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शाह, केंद्रीयमंत्री जे पी नड्डा एम्समध्ये दाखल झाले.