नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील जाखड (Sunil Jakhar) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. दिल्लीत त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J P Nadda) यांच्याशिवाय त्यांनी वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. काल त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचीही भेट घेतली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाखड यांनी काही दिवसांपूर्वी अनुशासनहीनतेची नोटीस आल्यानंतर काँग्रेस सोडली होती. पक्ष सोडण्यापूर्वी त्यांनी काँग्रेसवर बरीच टीका केली होती. जाखड यांचे कुटुंब जवळपास 50 वर्षे काँग्रेसमध्ये होते. सध्या त्यांचे तिसर्‍या पिढीतील पुतणे संदीप जाखड काँग्रेसचे आमदार आहेत.


कॅप्टन अमरिंदर सिंग यांना अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर बहुतांश आमदार त्यांच्या बाजूने असल्याचा आरोप सुनील जाखड यांनी केला होता. असे असतानाही त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले नाही. त्यामागचे कारण म्हणजे सोनिया गांधींच्या जवळच्या अंबिका सोनी. यापूर्वी काँग्रेसने जाखड यांना हटवून नवज्योत सिद्धू यांना प्रमुख केले होते. यानंतर नाराज होऊन जाखड हे सक्रिय राजकारणापासून दूर गेले होते.



सुनील जाखड यांना काँग्रेसने अनुशासनाची नोटीस पाठवली होती. निवडणुकीपूर्वी त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे काँग्रेसने म्हटले होते.  जाखड यांनी मात्र नोटीसला उत्तर दिलेले नाही. काँग्रेस हायकमांडने त्यांच्याशी बोलायला हवे होते, असे जाखड म्हणाले. उलट त्यांना नोटीस बजावण्यात आली.


काँग्रेसवर मोठे आरोप करत सोडला पक्ष


काँग्रेस सोडण्यापूर्वी सुनील जाखड यांनी पक्षाच्या नेत्यांवर मोठे आरोप केले. ते म्हणाले की, काँग्रेस नेतृत्वाला गुंडांनी घेरले आहे. राहुल गांधी निर्णय घेत नाहीत. त्यांनी मित्र आणि शत्रू ओळखला पाहिजे. जाखड यांनी अंबिका सोनी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, पंजाबमधील काँग्रेसचे बहुतांश प्रभारी सोनियांचे बाहुले बनून काम करत राहिले. जाखड यांनी काँग्रेसच्या उदयपूर चिंतन शिबिरावरही प्रश्न उपस्थित केले होते.