Raghuram Rajan : भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Former RBI Governor Raghuram Rajan) काँग्रेस (Congress) पक्षाच्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभागी झाले होते. राजस्थानमधील सवाई माधोपूरच्या भदोती येथून आज सकाळी काँग्रेसच्या भारत जोडा यात्रेला सुरुवात झाली.या यात्रेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासोबत रघुराम राजन (Raghuram Rajan) दिसत आहेत. (Political news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. ही यात्रा आता राजस्थानात पोहोचली आहे. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे आज सकाळी राहुल गांधी यांच्यासोबत राजस्थानच्या सवाई माधोपूरच्या भदोती येथे भारत जोडो यात्रेत सामील झाल्याने काँग्रेसला पाठिंबा दिला. हा व्हिडिओ सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रघुराम राजन आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान चालताना दिसत असून ते त्यांच्यासोबत चर्चाही करत आहेत. 


काँग्रेसची भारत जोडो यात्रा 13 डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये पुन्हा सुरु झाली. पदयात्रा सवाई माधोपूर जिल्ह्यातील जीनापूर भागातून सुरू झाली आणि त्याच जिल्ह्यातील देहलोद भागापर्यंत सुरु राहणार आहे. राजस्थान हे एकमेव काँग्रेसशासित राज्य आहे जिथे 21 डिसेंबरला हरियाणात प्रवेश करण्यापूर्वी 17 दिवसांत सुमारे 500 किमीचा प्रवास केला जाणार आहे. पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सोमवारी त्यांचे पती रॉबर्ट वड्रा आणि मुलगी मिराया यांच्यासह रॅलीत सहभागी झाल्या होत्या. या यात्रेने महिला सक्षमीकरणाचा संकल्प केला. 


मोठ्या संख्येने लोक बॅनर आणि पक्षाचे झेंडे घेऊन भारत जोडो यात्रेत सहभागी होताना दिसत होते. कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरु झालेली भारत जोडो यात्रा पुढील वर्षी 3,570 किमी अंतर कापेल. भारताच्या इतिहासातील कोणत्याही भारतीय राजकारण्याने पायी काढलेला हा सर्वात लांब पदयात्रा आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे.



हरियाणात राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा 23 डिसेंबरपर्यंत असेल. दुसऱ्या टप्प्यात ही यात्रा 6 जानेवारीला पानिपत जिल्ह्यातील सनोली खुर्द येथे उत्तर प्रदेशातून हरियाणात पुन्हा प्रवेश करेल.