मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी याने राजकीय खेळपट्टीवर पाऊल ठेवले आहे. पहिल्याच सामन्यात तो यशस्वी झाला. मनोज तिवारीचा बंगाल विधानसभा निवडणुकीत विजय झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोज तिवारी (Manoj Tiwary)ने ग्रेटर कोलकाता (Greater Kolkata) च्या शिबपूर (Shibpur) मतदारसंघातून टीएमसी (TMC) च्या तिकीटवर निवडणूक लढवली. बंगाल विधानसभा निवडणुकीत(Bengal Assembly Election) त्यांनी भाजप (BJP)च्या रथिन चक्रवर्ती (Rathin Chakraborty) यांचा 32 हजाराहून अधिक मतांनी पराभव केला आहे.


माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी टीम इंडियाकडून 12 एकदिवसीय सामने आणि 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. एकदिवसीय सामन्यात त्याने 26.09 च्या सरासरीने 287 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 1 शतक आणि अर्धशतक समाविष्ट आहे.


मनोज तिवारीचा आयपीएल रेकॉर्ड


आयपीएलमध्ये मनोज तिवारीने 98 सामन्यांत 28.72 च्या सरासरीने 1,695 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 7 अर्धशतके आहेत. तो कोलकाता नाईट रायडर्स, राइझिंग पुणे सुपरजायंट आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळला आहे.