मुंबई : प्रत्येक मुलगा किंवा मुलगी सुखी संसाराचं आणि आयुष्याचं स्वप्न पाहात असतात. लग्नानंतर प्रत्येकाच्या आयुष्याची नवीन सुरुवात होत असते. परंतु लग्नाच्या काहीच दिवसात जर संसार तुटला तर?  पोलीस ठाण्याच्या कुरुथियान गावाती एक विचित्र प्रकार घडला, यामध्ये नववधूने लग्नाच्या चौथ्याच रात्री मोठां कांड केला. ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. खरंतर काही दिवसांपासून ज्या घरात जल्लोषाचे वातावरण होतं, तेथे शोककळा पसरली आहे. एसएचओ अजय कुमार रजक यांनी सांगितले की, अर्जाच्या आधारे एफआयआर नोंदवल्यानंतर प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुरुथियान गावातील रहिवासी दिव्यांग धनेश्वर तिवारी याचा विवाह भोजपूर जिल्ह्यातील ज्योती कुमारी हिच्यासोबत 27 मे रोजी बखोरापूरच्या काली मंदिरात झाला होता.


31 मे रोजी धनेश्वरच्या लग्नानंतर चार दिवसांनी त्यांच्या घरी त्यांच्या धाकट्या भावाचा तिलक समारंभ होता. यामध्ये गावकऱ्यांशिवाय अनेक नातेवाईकही आले होते. नववधूच्या अनेक नातेवाईकांनीही तिलक सोहळ्याला हजेरी लावली.


या समारंभाची मेजवानी खाऊन वधूचे अनेक नातेवाईक निघून गेले, तर काही नातेवाईक घरीच थांबले. तिलक विधी आटोपल्यानंतर घरातील सर्व लोक थकून झोपे.


त्यानंतर जेव्हा रात्री 3 च्या सुमारास धनेश्वर तिवारी याला जाग आली, तेव्हा त्याला आपली बायको दिसली नाही, त्याने खूप वेळ तिची वाट पाहिली, परंतु तरी देखील त्याला ती दिसली नाही. त्यानंतर त्याच्या लक्षात आले की, खोलीतील बॉक्स ज्यामध्ये दागिने ठेवले होते. ते उघडं आहे. त्याने जेव्हा ते पाहिले तेव्हा तो धावत बाहेर आला आणि नववधूच्या घरच्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर त्याला कळले की, आपली फसवणूक झाली आहे. कारण नववधू आणि त्याच्या घरचेही तेथून पळून गेले होते.


नववधू ज्योती कुमारी आणि तिचा भाऊ गोपाल पांडे उर्फ पृथ्वी पांडे आणि गोविंद यादव यांनी मिळून 3 लाख ७५ हजार रुपये रोख, भावाच्या लग्नासाठी खरेदी केलेले अडीच लाखांचे दागिने चोरी केले होते. शिवाय ज्योतीला तिच्या सासरच्या मंडळींकडून 85 हजारांचे दागिनेही मिळाले होते, ते देखील ती घेऊन फरार झाली होती.


या घटनेनंतर धनेश्वरने पोलीसात तक्रार दाखल केली. ज्यानंतर पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.