नवी दिल्ली : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेत. सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान मोदी यांनी मॅक्रॉन दाम्पत्याचं औपचारिक स्वागत केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वेळी मॅक्रॉन यांना मानवंदना देण्यात आली. यानंतर मॅक्रॉन दाम्पत्यानं राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेतलं. राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर मॅक्रोन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा परिषदेचे उदघाटन करतील.


या परिषदेत १२५ देशांचे प्रतिनिधी मॅक्रो यांच्या या दौऱ्यात व्यापार, संरक्षण, ऊर्जा सहकार्य या संदर्भात करार होण्याची शक्यता आहे. तसंच मॅक्रो हे रविवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेणार असल्याचे बोललं जातंय.