स्त्रिचा पुरूष आणि पुरूषाची स्त्री तेही फुकट, हॉस्पिटलची भन्नाट स्कीम!
काहीजणांंचा स्वभाव त्यांच्या शरीरासोबत जुळत नाही यासाठी त्यांना शस्त्रक्रिया करावी लागते मात्र त्यांना ती परवडत नाही. अशांना आता फ्रीमध्ये शस्त्रक्रिया मिळत आहे.
Free Sex Reassignment Surgery : अनेकजण सौंदर्य खुलून दिसण्यासाठी निसर्गाच्या विरोधात जात काही शस्त्रक्रिया करताना दिसतात. काहीजणांंचा स्वभाव हा त्यांच्या शरीरासोबत जुळत नाही यासाठी ते शस्त्रक्रिया करतात. (Free Sex Reassignment Surgery) या शस्त्रक्रियेला लिंगबदल (Sex Reassignment Surgery) असंही म्हटलं जातं आणि यासाठी लाखोंचा खर्च येतो. अनेकजणांना परवडत नसल्याने ते मोठ्या चिंतेत असतात. आता अशांसाठी आनंदाची बातमी आहे.
दिल्ली महिला आयोगाने (Delhi Commission for Women) गेल्या अनेक दिवसांपासून यासाठी आपले प्रयत्न चालू ठेवले होते. अशा प्रकारची सेवा सुरू व्हावी यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असून आता ही मोठी खर्चिक असणारी शस्त्रक्रिया मोफत असणार आहे. दिल्लीच्या सरकारी हॉस्पिटमध्ये या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
हॉस्पिटलमध्ये बर्न आणि प्लास्टिक वॉर्ड असतो. रुग्णालयांकडे प्लास्टिक सर्जनही उपलब्ध असतात. त्यामुळे ही Sex Reassignment Surgery) मोफत करावी, अशा मागणीचं पत्र दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवला यांनी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला पाठवलं होतं. कोणत्याही ट्रान्सजेंडरला काही समस्या असल्यास ते हेल्पलाइन क्रमांक 181 वर संपर्क करा, असं आवाहनही स्वाती मालीवला यांनी केलं आहे.
दरम्यान, लिंग बदल शस्त्रक्रिया करणं परवडत नव्हतं. कारण यासाठी 10 ते 15 लाखांचा खर्च येत होता. मात्र आता ही सुविधा आता मोफत असल्याने याचा फायदा होणार आहे. हा निर्णय म्हणजे एक मोठं पाऊल असल्याचं म्हटलं आहे.