जम्मू-काश्मिर स्थित वैष्णो देवीला माता राणी, त्रिकुटा त्याचप्रमाणे वैष्णवी नावाने ओळखले जाते. हिंदू धर्मात वैष्णो देवीला देवी माहालक्ष्मीचे रूप मानले जाते. दर वर्षी अनेक भक्तजण येथे देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शनिवार एका इमारतीचे भूमी पुजन केले. या इमारतीत भक्तांना नि:शुल्क राहण्याची सुविधा देण्यात येणार आहेत. 


माता वैष्णो देवी श्राइन बोर्डाने राज्यपालांच्या आध्यक्षतेखाली बैठक पार पाडण्यात आली. दर वर्षी वैष्णो देवी मंदीरीत येणाऱ्या भक्तांना अतिरीक्त सुविधा प्रदान करण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यपालांनी भवन क्षेत्रात नवीन दुर्गा भवन निर्माण करण्यात येणार आहे. या इमारतीत रोज तब्बल ४ हजार भक्तांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. 
 
इमारत बांधण्यासाठी ५० कोटींचा निधी देण्यात आलेला आहे. पाच मजली इमारतीमध्ये भक्तांसाठी लिफ्टची सुविधा देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे लॉकर्स, शौचालय, अंथरूण-पांघरूण आणि खाण्याची सुविधा मिळणार आहे. भवन क्षेत्र स्थित नवीन इमारत सर्वात मोठी इमारत असणार आहे. विशेष म्हणजे ही इमारत भूकंपविरोधी असणार आहे.