शिमला : हिमाचल प्रदेशची राजधानी शिमल्यात सलग चार दिवस बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे नागरिकांना निसरड्या रस्त्यांवरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्या रस्त्यांवर बर्फ साचल्याने पायीच प्रवास करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठीही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. थंडी असल्याने पाणीही गोठले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न तीव्र झाला आहे. तर काही भागांमध्ये रस्त्येही बंद झाले आहे. त्यामुळे येथे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तराखंडच्या डोंगराळ भागात मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. हॉटेल, टॅक्सी, स्थानिक दुकानदार आता पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून इथे बर्फवृष्टी सुरु आहे. चमोलीमध्ये तर नजर जाईल तिकडे फक्त बर्फच दिसतोय. रस्ते, दुकानं, घरे बर्फाच्छाजदित झाली आहेत. 



चमोलीतल्या औलीमध्ये तर सात फूट बर्फ साचला आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावील बर्फ हटविण्याचे काम करण्यात येत आहे. मात्र, बर्फाचा थर मोठा असल्याने अडचणी येत आहेत. दरम्यान, याच वातावारणात इथे विंटर स्पोर्ट्स ही सुरु आहे.