मुंबई : राजधानी दिल्लीत हवेच्या प्रदूषणाची समस्या सतावत आहे. दिल्ली सरकारने देखील यामुळे शाळांना सुट्टी जाहीर केली होती. दिल्लीच्या हवेपाठोपाठच आता पाणी देखील बेशुद्ध असल्याचं समोर आलं आहे. गेल्या 15 दिवसांपासून दिल्लीची हवा दूषित असून नागरीक हैराण आहेत. यावर उपाय म्हणून आता Oxy Pure नावाचा कॅफे सुरू करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कॅफेत शुद्ध ऑक्सिजनचा डोस दिला जातो. 15 मिनिटांची शुद्ध हवेसाठी 299 ते 499 रुपये मोजावे लागणार आहेत. या कॅफेत वेगवेगळ्या फ्लेवरचे ऑक्सिजन उपलब्ध आहेत. दिल्लीच्या साकेत शहरात ऑक्सिजन बार सुरू झाला आहे. ज्याचं नाव आहे 'Oxy Pure'असून ग्राहकांना लेमनग्रास, नारंगी, दालचिनी, पुदीना, नीलगिरी आणि लवेंडर फ्लेवरचे ऑक्सिजन उपलब्ध आहेत. 299 रुपयाला 15 मिनिटे ऑक्सिजन या बारमध्ये मिळतो. सात प्रकारच्या फ्लेवर ऑक्सिजनला ग्राहकांची पसंती आहे. 499 रुपयाला अरोमा मिळतो. 



गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाची स्थिती फार गंभीर आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने शाळांना देखील काही दिवसांकरता सुट्टी जाहीर केली होती. आता दिल्लीची हवा त्याचबरोबर पाणी देखील अशुद्ध असल्याचे समोर येत आहे. केंद्र सरकारने देशातील २१ शहरांतील पाण्याची चाचणी केली.