नवी दिल्ली : मैत्रीचं नातं खूपच सुंदर असतं. हे नातं जाती धर्माच्या पलीकडे जाऊन जपलं जातं. मैत्री जगातील असं नातं आहे. की ज्याला विना अट हृदयापासून निभावलं जातं. जगभरात ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवळपास सर्वच स्तरातील लोकं आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस साजरा करतात. परंतु हा मैत्री दिवस साजरा करण्यास कधीपासून सुरूवात झाली. त्याचा नक्की इतिहास काय त्याबाबत जाणून घेऊ या


फ्रेंडशिप डे चा इतिहास
फ्रेंडशिप डे ची सुरूवात 1958 मध्ये झाली होती. 1958 च्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. आपल्या मित्राच्या आठवणीत मृत झालेल्या व्यक्तीच्या मित्राने आत्महत्या केली. तेव्हापासून अमेरिकी सरकारने ऑगस्टचा पहिला रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा निर्णय घेतला.


आणखी एक गोष्ट
 Paraguay चे डॉक्टर रमन आर्टेमियोने 20 जुलै 1958 मध्ये एक डिनर पार्टीचे आयोजन केले होते. ज्या दरम्यान त्यांनी आपल्या मित्रांसोबत फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा विचार मांडला होता. त्यानंतर जगभरात फ्रेंडशिप डे साजरा करण्यास सुरूवात झाली.