Packaged Drinking Water As High Risk Food Category : पाण्याशिवय जीवन अशक्य आहे. मात्र, दूषित पाणी जीववर बेतू शकते. अनके धोकादायक आजार हे पिण्याच्या पाण्यातूनच होतात. यामुळे अनेकजण बाहेर गेल्यावर बाटलीबंद अर्थात मिनरल वॉटर पितात. मात्र, बाटलीबंद पाणी पिणाऱ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. बाटलीबंद पाण्याचा समावेश धोकादायक खाद्यपदार्थात झाला आहे.  भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSAI ने बाटलीबंद पाणी आणि मिनरल वॉटर हे हाय रिस्क फूड कॅटेगरी म्हणून हाताळण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता बाटलीबंद पाणी पिताना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असे अन्न पदार्थ जे शिजवण्याची गरज नाही असे रेडी टू इट पदार्थ,  शिजवलेले मांस आणि मासे,  ग्रेव्ही, स्टॉक, सॉस, सूप तसेच दुग्धजन्य पदार्थ हे  हाय रिस्क फूड कॅटेगरीमध्ये मोडतात. यामुळे या पर्दार्थांच्या विक्रीबाबत कठोर नियम आहेत. हे पदार्थ विकणाऱ्यांना तसेच खरेदी करणाऱ्यांना विशेष खबरदारी घ्यावी लागते. आता या  हाय रिस्क फूड कॅटेगरीमध्ये बाटलीबंद पाण्याचा देखील समावेश झाला आहे.   FSSAI ने बाटलीबंद पाणी आणि मिनरल वॉटर हे हाय रिस्क फूड कॅटेगरी म्हणून हाताळण्याच्या सूचना केल्या आहेत.


FSSAI ने बाटलीबंद पाणी आणि मिनरल वॉटर यांचा समावेश हाय रिस्क कॅटेगरीत केल्यामुळे दरवर्षी थर्ड पार्टी कंपनीतर्फे पाणी विक्री कंपन्यांचे ऑडिट होणार आहे. ऑडिट करणाऱ्या या थर्ड पार्ची कंपन्या या FSSAI मान्यता प्राप्त असल्या पाहिजते. बाटलीबंद कंपन्यांना आता FSSAI  आणि BIS यांच्याकडून दुहेरी प्रमाणपत्र मिळवण्याची अट वगळण्यात आली. यामुळे बाटलीबंद पाणी विकणाऱ्या कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, थर्ड पार्टी कंपनीतर्फे ऑडिट करताना पाण्याच्या गुणवत्तेसह PH लेव्हल देखील तपासला जाणार आहे. यामुळे अन्न सुरक्षा नियमानुसार कडक तपासणी करुन थर्ड पार्टीमार्फच प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे प्रमाणपत्र नसेल तर कारवाई केली जाईल. 


बाटलीबंद पाणी आणि मिनरल वॉटर यांचा हाय रिस्क फूड कॅटेगरीत समावेश झाल्याने पाणी विकत घेताना ग्राहकांना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. पाण्याची बॉटल विकत घेताना त्यावर FSSAI चे प्रमाणपत्र आहे का ते तपासून घ्यावे.