मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. यामुळे याचा फायदा भारतीय ग्राहकांना मिळणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग सातव्या दिवशी घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे  पेट्रोल २.६९ तर डिझेल २.३३ रुपयांनी स्वस्त झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक देशात पेट्रोल आणि डिझेल दरात एक रुपया प्रति लीटरमागे घरसण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सौदी अरब आणि रशिया या देशांतमध्ये किमतीवरुन व्यवहारात बाधा आली आहे. तसेच कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घट झालेली पाहायला मिळत आहे. सोमवारपासून कच्चा तेलाच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय वायदा बाजारात ३१ टक्क्यांनी घट दिसून येत आहे. तेलाच्या उत्पादनावरुन सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यात सुरु असलेल्या शीतयुद्धाचे परिणाम कच्या ते लाच्या किंमतीवर दिसून येत आहेत. १९९१ मध्ये झालेल्या आखाती युद्धानंतर प्रथमच कच्या तेलाच्या दरात एवढी मोठी घसरण झाली आहे.


देशांतर्गत बाजारपेठेत इंधन दर कपातीचे सत्र कायम आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय कमॉडिटी बाजारात खनिज तेलाच्या किंमतीमधील सोमवारी मोठी घसरण दिसून आली. खनिज तेलाचा भाव घसरला आहे. त्याचा परिणाम हा दिसून येत आहे. 


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाच्या किमतीत सातत्याने घट दिसून येत आहे. इंडियन ऑयलच्या संकेतस्थळानुसार, दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रथमच ७०.२० रुपये प्रति लिटर झालाआहे. चारही शहरात डिझेलचा दरही कमी झाला आहे. अनुक्रमे दिल्ली ६३.०१ रुपये, कोलकाता ६५.३४ रुपये, मुंबई ६५.९७ रुपये आणि चेन्नईत ६६.४८ रुपये झाला आहे.


तेल बाजारपेठेतील भागधारकांचे प्रमुख उत्पादकांनी सांगितले की, सोमवारी ब्रिटीशमधील कच्चा तेलाचा भाव प्रति बॅरल ३१.२७ डॉलर घसरला होता. तो फेब्रुवारी २०१६ नंतरचा सर्वात मोठी घसरण आहे.


0