पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याचे संकेत
पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दराने हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण पुढील महिन्यात दिवाळीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता असल्याचे संकेत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत.
अमृतसर : पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दराने हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण पुढील महिन्यात दिवाळीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता असल्याचे संकेत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत.
अमृतसरच्या दौऱ्यावर असणाऱ्या पेट्रोलियम मंत्री प्रधान यांनी दिवाळीपर्यंत इंधनाच्या दरात कपात होईल असे संकेत दिले आहेत. प्रधान यांना अलिकडेच कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा मिळाला आहे. त्यांना कौशल्य विकास आणि उद्योजकता खात्याचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला आहे. अमेरिकेत आलेल्या पुरामुळे तेलाच्या उत्पादनात १३ टक्क्यांनी घट झाली आहे, परिणामी रिफायनरी तेलाचे भाव वाढल्याची माहिती प्रधान यांनी दिली.